जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा!
By Admin | Updated: April 6, 2016 01:30 IST2016-04-06T01:30:41+5:302016-04-06T01:30:41+5:30
पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून

जलयुक्तची कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण करा!
पुणे : पहिल्या टप्प्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत घेतलेल्या २00 गावांपैकी १३0 गावांत १00 टक्के कामे झाली आहेत. ७0 गावांत कामे अपूर्ण असून, ती पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जलयुक्त शिवार योजनेचा सोमवारी जिल्हा परिषदेत झालेल्या बैैठकीत आढावा घेण्यात आला. त्या वेळी राव यांनी वरील सूचना दिल्या.
या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती१६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशी २00 गावांची निवड झाली होती.
या गावांत कपार्टमेंट बिडिंग, सलग समतलचर, माती नाला बांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्दन स्ट्रक्चर, माती नाला बांध दुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनभर््ारण चर,रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे, मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ७१११ कामे हाती घेण्यात आली होती. यासाठी २४१.८६ कोटींचा आराखडा तयार केला होता. यातील ५ हजार १३ कामे पूर्ण झाली असून, यातील १२१ कोटींचा निधी यावर खर्च झाला आहे. २ हजार ९८ कामे अद्याप सुरू आहेत.
गेल्या पावसाळ्यापूर्वी झालेल्या कामातून ३00७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८८४३.५ एवढे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. सध्या जिल्ह्यात ७९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. जलयुक्तच्या कामांमुळे ३0 ते ४0 टँकर वाचले आहेत; अन्यथा आज टँकरची संख्या २00 पेक्षा अधिक झाली असती.
या पार्श्वभूमीवर झालेल्या बैैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित कामांसाठी ७ जूूनची डेडलाइन दिली आहे. जर ही कामे झाली, तर पुढील वर्षात आणखी टँकर कमी होण्यास मदत होईल.