शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही तोपर्यंत हमाल पंचायतीशी पूर्णपणे असहकार : दि पूना मर्चट चेंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 20:18 IST

मार्केट यार्डातील " दोन नंबरची संस्कृती कोरोनापेक्षा भयानक आहे"असे विधान केले होते.

ठळक मुद्देडाॅ.बाबा आढाव यांच्या विधानाचा दि पूना मर्चंटस् चेंबर कडून निषेध 

पुणे : हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी तोलणार संघटनेच्या आंदोलनाच्या वेळेस मार्केट यार्डातील " दोन नंबरची संस्कृती कोरोनापेक्षा भयानक आहे" असे विधान केले होते. डाॅ. आढाव यांच्या या विधानाचा दि पूना मर्चंट चेंबरतर्फे जाहिर निषेध करत जोपर्यंत बाबा आढाव माफी मागत नाही, तोपर्यंत हमाल पंचायत या संघटनेशी कोणतीही चर्चा अथवा वाटाघाटी करणार नसल्याची ठाम भूमिका चेंबरने  घेतली आहे. याबाबत दि पूना मर्चंट चेंबरने लेखी पत्रक काढले असून यामध्ये बाबांचे वय झाल्यामुळे त्यांचा तोल ढासळला आहे,  अशी आमची समजूत झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आम्ही काम करतो. त्यांची आमच्यावर देखरेख असते. आमचे सभासद दरवर्षी गुळ भूसार विभागातून सुमारे १८ कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा सेमचा भरणा करतात. दोन नंबर संस्कृतीच्या देखरेखीकरिता सरकारी यंत्रणा सक्षम आहेत. बाबांनी स्वतःचे आत्मचिंतन करावे. आपले वारणार कामगार जेथे वाराई व हमाली ८०० ते १००० रुपये होते. तेथे वाराई व हमाली दादागिरी व अडवणूक करून दुप्पट किंवा तिप्पट घेतात. दादागिरी करणे, डमीचा उपयोग करणे या गोष्टींचा सर्वप्रथम बाबांनी विचार करायला हवा. व्यापारी काय काम करतात किंवा नाही यात बाबांनी लक्ष देण्याची गरज नाही. २८ तोलणार हे व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवत होते, असे बाबांचे म्हणणे आहे.

तोलणार हे तोलाईची काम सोडून इन्स्पेक्टरचे काम करीत होत का? वरील विधानांची बाबा आढाव हे जाहिर माफी मागत नाहीत तोपर्यंत दि पूना मर्चटस् चेंबरतर्फे हमाल पंचायतशी कोणतेही सहकार्य व चर्चा यापुढे करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी अशी माहिती दि पूना मर्चेटस्चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. 

टॅग्स :PuneपुणेMarketबाजारBaba Adhavबाबा आढावbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या