दुरुस्तीची २१२ कामे पूर्ण

By Admin | Updated: December 24, 2015 00:45 IST2015-12-24T00:45:17+5:302015-12-24T00:45:17+5:30

महावितरणच्या सोमेश्वर उपविभागाच्या वतीने मोरगाव येथे नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची २१२ कामे करण्यात आली

Complete correction 212 works | दुरुस्तीची २१२ कामे पूर्ण

दुरुस्तीची २१२ कामे पूर्ण

बारामती : महावितरणच्या सोमेश्वर उपविभागाच्या वतीने मोरगाव येथे नुकताच त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकाच दिवसात विजेची २१२ कामे करण्यात आली. वीज समस्यांचा जागेवरच निपटारा झाल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
त्रिसूत्री कार्यक्रमांतर्गत २५ घरगुती व व्यापारी वीजजोडण्या तपासण्यात आल्या. तर, ४ ठिकाणचे वाकलेले खांब सरळ करण्यात आले. ७ रोहित्रांमध्ये आॅईल भरण्यात आले. लघुदाब वाहिनीवरील २० ठिकाणी, तर उच्चदाब वाहिनीवरील ७ ठिकाणी वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्य. ९ रोहित्रांची दुरुस्ती करण्यात आली. ११ ठिकाणी कटआउट बदलण्यात आले. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता केशव सदाकाळे, विभागाचे कार्यकारी अभियंता मधुकर घुमे, सोमेश्वर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. सी. म्हेत्रे, सोमेश्वरचे शाखा अभियंता ए. डी. बिरनाळे, मोरगावचे शाखा अभियंता एस. के. चौधरी, नीरा ग्रामीणचे शाखा अभियंता एस. एन. पंचरस, वडगावचे शाखा अभियंता डी. डी. नाळे यांच्या देखरेखीखाली सोमेश्वर उपविभागातील सोमेश्वर, मोरगाव, नीरा (ग्रा.), वडगाव, कोऱ्हाळे, सुपा या शाखांमधील एकूण ३७ कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. (वार्ताहर)

Web Title: Complete correction 212 works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.