शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

उशिरा फटाके फोडण्यासंदर्भात तक्रारी दाखल : मात्र नियम मोडणाऱ्यांवर कारवाई नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 01:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करून रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास बंदी असतानादेखीला विविध भागांत फटाके फोडण्यात आले. मात्र, पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

पुणे - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करून रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास बंदी असतानादेखीला विविध भागांत फटाके फोडण्यात आले. मात्र, पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. फटाके वाजविण्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्यानंतरदेखील शहरात एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे दिसून आले आहे.पुणे पोलिसांच्या नियत्रंण कक्षाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत; परंतु त्याबाबत आकडेवारी उपलब्ध नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर ३५ तक्रारी आल्या आहेत. दिवाळीच्या काळात शहरात रात्री दहानंतरही फटक्यांचा आवाज घुमला. रात्री उशिरापर्यंत फटाके वाजविणाºयांवर कारवाई करणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. प्रत्यक्षात तक्रारी आल्यानंतरही एकही कारवाई करण्यात आली नाही. याउलट, येरवड्यात फटाके वाजविणाºयांकडून पोलिसांनाच मारहाण झाल्याची घटना घडली. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक कार्यक्रमात फटाके उडविण्यासाठी रात्री आठ ते दहा अशी दोन तासांची मुभा दिली होती. त्यानंतर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणीही फटाके वाजवू शकत नाही. यंदा मोठ्या प्रमाणात मध्यरात्रीपर्यंत फटाके वाजविण्यात आल्याचे दिसून आले.पोलिसांची करडी नजरदहानंतर फटाके वाजविणाºयांवर पोलिसांकडून करडी नजर ठेवून वरिष्ठांकडून संबंधित पोलीस ठाण्यांना कारवाई करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच, कोणी तक्रार किंवा नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिल्यास कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, शहरात रात्री दहानंतरच्या फटाकेबंदी आदेशाचे उल्लंघन करून लक्ष्मीपूजना दिवशी रात्री बारानंतरही फटाक्यांचे आवाज शहरभर घुमले.टोळक्याकडून पोलिसांना अरेरावीपुणे : येरवडा भागात फटाके वाजविणाºया टोळक्याकडून पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याच्या दोन घटना लक्ष्मीपूजना दिवशी घडल्या. एका घटनेत टोळक्याने पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत पोलीस शिपाई गायकवाड जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फटाके वाजविण्यासाठी गर्दी केलेल्या त्या लोकांना, पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी रात्री दहानंतर फटाके वाजविण्यास मनाई असल्याचे सांगितले. त्याचप्रसंगी येरवडा भागातील पोलीस शिपाई गायकवाड तेथून जात होते. त्यानंतर गायकवाड यांनी रस्त्यावर थांबलेल्या टोळक्याला तेथून जाण्यास सांगितले. टोळक्यातील काही जणांनी गायकवाड यांना धक्काबुक्की केली. त्यांपैकी एकाने गायकवाड यांच्या चेहºयावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. त्यानंतर टोळके तेथून पसार झाले. पोलीस हवालदार सुनील जाधव तपास करीत आहेत.फटाके वाजविण्यावरून पोलीस कर्मचाºयांना धक्काबुक्की करण्याचा दुसरा प्रकार येरवडा गाडीतळ भागात घडला. लक्ष्मीपूजना दिवशी रात्री अकराच्या सुमारास फटाके वाजविणाºया टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्यात आली.पोलीस शिपाई कपिल भाकरे यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गाडीतळ भागातील मदर तेरेसानगर परिसरात रात्री टोळक्याकडून फटाके वाजविण्यात येत होते. पोलीस शिपाई भाकरे, चौरे तेथे गेले. त्या वेळी तेथे दीडशे ते दोनशे जण फटाके उडवत होते. त्यांना समज दिल्यानंतर टोळक्याने ‘फटाके न उडविण्यास सांगणारे तुम्ही कोण?’ असे म्हणून पोलीस शिपाई भाकरे आणि चौरे यांना धक्काबुक्की केली.नोंदविलेल्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मीपूजना दिवशी (दि. ७) रात्री साडेदहाच्या सुमारास येरवड्यातील गोल्फ चौकात टोळके फटाके वाजवत होते.त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे आपले काम संपवून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले असताना त्यांना गोल्फ क्लब चौकातील एका हॉटेलसमोर गर्दी दिसली. नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्यासाठी ते गेले.दोन दिवसांत १७ ठिकाणी आगीच्या घटनादिवाळीच्या कालावधीत शहराच्या विविध भागांमध्ये आग लागल्याच्या १७ घटना घडल्या. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवारी) १३, तर पाडव्या दिवशी (गुरुवारी) ४ ठिकाणी आग लागली. यात दोन मोठ्या आगीच्या घटना वगळता इतर किरकोळ स्वरूपाच्या असल्याचे दिसून आले.शहरातील गुरुवार पेठ, रास्ता पेठ, सदाशिव पेठ, कर्वे पुतळा, बावधन, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, सिंध कॉलनी, वानवडी, उंड्री, विमाननगर, खराडी या भागात आग लागल्याच्या घटना घडल्या. खराडी येथे घर, गाडी, गवताला आग लागली होती.पाडव्याच्या दिवशी भवानी पेठेतील कारखान्याला लागलेली आग मोठ्या स्वरूपाची होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्नांनी ती आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. तर, इतर तीन ठिकाणीही किरकोळ आगीच्या घटना घडल्या.अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना झालेली नाही. शॉर्ट सर्किटसह किरकोळ कारणांमुळे या आगीच्या घटना घडल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, शहरात कुठेही फटाक्यांमुळे आग लागलेली नाही,असे अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी सातपासून रात्री दहापर्यंत एकूण १३ ठिकाणीआगीच्या घटना घडल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या तत्परतेमुळे या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.किरकोळ कारणांमुळे या घटना घडल्या असून, फटाक्यांमुळे शहरात काही ठिकाणीकिरकोळ कारणावरूनआग लागल्याचे आढळून आले, अशी माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :fire crackerफटाकेPuneपुणे