गिरीश कुबेर यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:11 IST2021-05-27T04:11:58+5:302021-05-27T04:11:58+5:30

पुणे : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित पुस्तकात महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल अत्यंत चुकीची, निराधार ...

Complaint filed against Girish Kuber for defamation | गिरीश कुबेर यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार

गिरीश कुबेर यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार

पुणे : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर लिखित पुस्तकात महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज तसेच महाराणी सोयराबाई यांच्याबद्दल अत्यंत चुकीची, निराधार व बदनामीकारक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दिला आहे.

कुबेर यांचे ‘रेनिसन्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. यात छत्रपती संभाजी महाराज, राणी सोयराबाई यांची बदनामी झाल्याने पुस्तकावर तातडीने बंदी घालावी. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रार अर्जात करण्यात आली आहे. अशाच प्रकारचे अर्ज अनेक पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Web Title: Complaint filed against Girish Kuber for defamation