नारायणगाव : पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरण आणि चाळकवाडी टोलनाक्यासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनची तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, भूसंपादन अधिकारी श्रीमंत पाटोळे, आंबेगाव-जुन्नर उपविभागीय अधिकारी सारंग काडोलकर, तहसीलदार हनुमंत कोळेकर, महावितरण अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोठे, सार्वजनिक बांधकाम पुणे विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, अंकुश आमले, भाऊसाहेब देवाडे, खा. अमोल कोल्हे यांचे बंधू राजेंद्र कोल्हे, आळे गावचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे, खामगाव उपसरपंच अजिंक्य घोलप यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जुन्नर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्ग भूसंपादन, अष्टविनायक मार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादन यांसह विविध विषयांसंदर्भात महत्त्वाची बैठक पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये अष्टविनायक महामार्गावरील नारायणगाव येथील कोल्हे मळा भागातील भूसंपादन, जुन्नर तालुक्यातील कामगार पोलीस पाटील रिक्त पदे भरती, आणे पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारत बांधकामासाठी जागा मिळावी, जुन्नर तालुक्यातील कृषी मंडल कार्यालय नूतनीकरण करावे, आणे येथे पर्जन्यमापक यंत्रणा बसवावी, जुन्नर तालुका प्रशासकीय इमारत जागा मिळावी, खामगाव अंतर्गत मांगणेवाडी, ठाकरवस्ती भूस्खलनबाबत आढावा घ्यावा, डिंगोरे सौर प्रकल्पास गायरान जमीन मिळावी, नेतवड येथील धरणातील गाळ काढावा आदी विषयावर चर्चा झाली .
अतुल बेनके म्हणाले की, जुन्नर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण, पुणे-नाशिक रेल्वे अशा विविध शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेकदा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये काहीसा संघर्ष पाहायला मिळतो. यामध्ये लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार डॉ. अमोल कोल्हे व आपण स्वतः समन्वयाची भूमिका घेत तोडगा काढत असतो. आजही जिल्हाधिकारी कार्यालय येथे तालुक्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात भूसंपादन व नुकसान भरपाईविषयी बैठक होऊन प्रशासनासमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे .
२७ नारायणगाव
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना आ. अतुल बेनके.
270821\screenshot_20210827-150124.jpg
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जुन्नर तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करताना आ. अतुल बेनके .