कंपनीला पावणे चार लाख रूपयांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:16 IST2017-08-04T03:16:58+5:302017-08-04T03:16:58+5:30

कंपनीच्या संचालकाच्या ईमेल आयडीचा बनावट ईमेल आयडी तयार करून तो त्यांच्या मेलवर पाठवित कंपनीच्या खात्यावर बिलापोटी ३ लाख ७५ हजार रूपये भरायला सांगून कंपनीची फसवणूक

 The company has to pay four lakh rupees | कंपनीला पावणे चार लाख रूपयांचा गंडा

कंपनीला पावणे चार लाख रूपयांचा गंडा

विमानतळ : कंपनीच्या संचालकाच्या ईमेल आयडीचा बनावट ईमेल आयडी तयार करून तो त्यांच्या मेलवर पाठवित कंपनीच्या खात्यावर बिलापोटी ३ लाख ७५ हजार रूपये भरायला सांगून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरूद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनिष दातार (वय ३१ (रा. मातोश्रीनगर, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टुलटेक ग्लोबल इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत.
अज्ञात व्यक्तीने त्यांचा बनावट ई मेल आयडी तयार केला आणि तो फिर्यादीच्या आयडीवर मेल केला. शिप मॅनेजमेंट या कंपनीच्या
खात्यावर ३ लाख ७५ हजार रूपये भरण्यास सांगून फिर्यादी व त्यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title:  The company has to pay four lakh rupees