शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने प्रवासी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 20:55 IST

समस्या सुटेना : अपघात, बंद पडलेली वाहने, खड्डे व रमलर कोंडीचे कारण 

शेलपिंपळगाव : मागील दोन दिवसांपासून चाकण-शिक्रापूर राज्यमहामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, साबळेवाडी व बहुळ हद्दीत प्रवाशांना प्रचंड कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाहनांचे अपघात, घाट माथ्यावर बंद पडलेली वाहने, रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व रस्त्यावर वेग नियंत्रण करण्यासाठी टाकलेले रमलर वाहतूक कोंडीचे कारण बनत आहे. रस्त्यावरून चार-पाच किमीचे अंतर जाण्यासाठी अक्षरशः तासभराचा कालावधी लागत असल्याने वाहतूकदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पोलिस प्रशासनाचे वाहतूक कोंडीवर नियंत्रण नसल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कोंडीचा प्रत्यय मागील दोन दिवसांत येत असून, साबळेवाडी ते मोहितेवाडी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहेत.

चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोंडीची समस्या कायम असल्याचे निदर्शनास येत आहे. चाकण-शिक्रापूर हा रस्ता पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचे होत असल्याने बहुतांशी वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. औद्योगिक वसाहतींचा कच्चा माल परराज्यातून घेऊन येणारी अनेक मोठी वाहने सातत्याने प्रवास करत आहेत.

सद्यस्थितीत एकाचवेळी रस्त्यावर शेकडो अवजड वाहने येत आहेत. अरुंद रस्ता कोंडीत अधिक भर घालत आहे. साबळेवाडी वळणालगत बीअर घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. तर बहुळ हद्दीतील घाट रस्त्यावर दोन अवजड वाहने एकापाठोपाठ नादुरुस्त होऊन बंद अवस्थेत भर रस्त्यावर उभी होती. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. त्यात अलीकडच्या काही दिवसांत शेलपिंपळगावही वाहतूक कोंडीचे केंद्र बनत चालले आहे. स्थानिक जनता दररोजच्या कोंडीला कंटाळली असून, सदरची कोंडी फोडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड