नोटाबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण
By Admin | Updated: November 16, 2016 02:58 IST2016-11-16T02:58:23+5:302016-11-16T02:58:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटा त्वरित बंदचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा परिणाम किराणा दुकान,

नोटाबंदीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण
पिंपरी सांडस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटा त्वरित बंदचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा परिणाम किराणा दुकान, पेट्रोलपंप, हॉटेल या व्यवसायांपासून लहान-लहान व्यवसायावरही झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ खरेदीसाठी दुकानात गेल्यावरदेखील दुकानदाराकडून ‘सुटे द्या’ अथवा ‘५०० रुपयांचा माल खरेदी करा,’ असे सांगण्यात आले. दुकानदारांकडे गेल्यानंतर या नोटा कोणताही दुकानदार घेईना, तसेच सुटेही देईना. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सर्व ठिकाणी हैराण झाल्याचे आढळून आले, अशी चर्चा चालू आहे.