शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचे बँकेतील पैसे असुरक्षित : विश्वास उटगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 19:12 IST

देशभरातील बँका डबघाईला आलेल्या आहेत...

ठळक मुद्देबड्या कर्जदारांना अभयसर्व बँकातील ११० लाख कोटी ठेवी त्यापैकी १०५ लाख कोटी कर्ज वाटप नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने देशातील सेवाक्षेत्र बलाढ्य

पुणे: केंद्र सरकार देशातील बड्या कर्जदारांची कर्जे माफ करत आहे. ही कर्जे सर्वसामान्यांनी बँकांमध्ये विश्वासाने ठेवलेल्या ठेवीतून दिली गेलेली आहेत. ती बुडाली की बँक बुडाली व ठेवीदारांचा पैसाही बुडाला. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांनी बँकांमध्ये ठेवलेले पैसे सुरक्षित नाहीत असे देशातील अर्थतज्ज्ञ सांगत असल्याचे प्रतिपादन बँक कर्मचारी महासंघ नेते विश्वास उटगी यांनी केले.ज्येष्ठ कामगार नेते अप्पासाहेब भोसले यांच्या १६ व्या स्मृती दिनानिमित्त पुणे महापालिका कामगार युनियनच्या वतीने श्रमिक भवन, एकलव्य सभागृह येथे उटगी यांच्या कार्पोरेट जगतातून होणारी लूट या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदय भट होते. उटगी म्हणाले, नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने देशातील सेवाक्षेत्र बलाढ्य झाले आहे. शेती व्यवसाय लयास गेला म्हणून शेतकरी हवालदिल अवस्थेत आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. तरी देखील जनता गप्प का? असा सवाल उपस्थित कामगारांना उटगी यांनी केला. देशभरातील बँका डबघाईला आलेल्या आहेत. सर्व बँकातील ११० लाख कोटी ठेवी आहेत त्यापैकी १०५ लाख कोटी कर्ज वाटप केले आहेत. त्या कर्जांपैैकी १८ लाख कोटी कर्ज बुडीत आहे. ते वसूल झाले नाही तर देशातील काही बँका बंद पडून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडल्या शिवाय राहाणार नाही अशा इशारा अर्थ तज्ञांनी दिला आहे.   केंद्र सरकारच्या  लोकशाही विरोधी व कामगार विरोधी धोरणाला विरोध  करण्यासाठी  देशभरातील  सर्व क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, शिक्षक, प्राध्यापक, मध्यमवर्गीय यांनी एकजुटीने एकत्र लढल्याशिवाय पर्याय नाही असे नमूद करून ८ जानेवारीच्या देशव्यापी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले.  शालेय परिक्षात ५०टक्के गुण मिळवणाºया मुला मुलींना देखील हजारोंच्या संख्येने रोख पारितोषिके देण्यात आली. शिक्षणाचे स्वरूप बदलल्याने मागील वषार्पासून या योजनेत बदल करून इयत्ता ९ वी पासून पुढे शैक्षणिक पात्रता व ६५% गुण मिळवणाºयाा मुला मुलींना पारितोषिक देण्यात आले.  चंद्रकांत गमरे यांनी आभार व्यक्त केले.                

टॅग्स :PuneपुणेbankबँकMONEYपैसा