पाणीपुरवठा योजनेसाठी कटिबद्ध: पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:31+5:302021-07-23T04:08:31+5:30

तळेगाव ढमढेरे : येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा पुनर्वसनाचा प्रश्न व नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, ...

Committed to water supply scheme: Pawar | पाणीपुरवठा योजनेसाठी कटिबद्ध: पवार

पाणीपुरवठा योजनेसाठी कटिबद्ध: पवार

तळेगाव ढमढेरे : येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा पुनर्वसनाचा प्रश्न व नवीन पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सुसज्ज व अद्यावत नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, घोडगंगा कारखान्याचे उपाध्यक्ष बाबा पाटील-फराटे, संचालक बाळासाहेब ढमढेरे, पोपट भुजबळ, माजी संचालक ॲड. सुधीर ढमढेरे, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, विश्वास ढमढेरे, ॲड. यशवंत ढमढेरे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, संजय गांधी, निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष ॲड. सुदीप गुंदेचा, माजी अध्यक्ष संदीप ढमढेरे, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीमध्ये कामकाज करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मासिक मीटिंग या इमारतीत घेता येत नव्हती त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज नवीन अद्ययावत इमारतीमध्ये सुरू करावे, अशी मागणी केली होती.

२२ तळेगाव ढमढेरे

ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन करताना अशोक पवार व इतर.

Web Title: Committed to water supply scheme: Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.