भांडगाव येथे मुलांचे सर्वेक्षण कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:28+5:302021-06-09T04:13:28+5:30
भांडगाव (ता. दौंड) येथे ० ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी दौंड ...

भांडगाव येथे मुलांचे सर्वेक्षण कामाचा शुभारंभ
भांडगाव (ता. दौंड) येथे ० ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करणे कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी दौंड तालुका पंचायत समितीच्या सभापती हेमलता फडके, उपसभापती सयाजी ताकवणे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे ,जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्य सुशांत दरेकर, झुंबर गायकवाड, विस्तार अधिकारी मुलाणी, केंद्रप्रमुख चव्हाण, अंगणवाडी सुपरवायझर तळपे, सरपंच संतोष दोरगे, सदस्या नीलम दोरगे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक रंधवे, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक कदम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र जगताप, सर्व्हेक्षण करणारे सर्व शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस इत्यादी उपस्थित होते.
उपसभापती सयाजी ताकवणे तसेच गटविकास अधिकारी येळे यांनी सर्वेक्षणा बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वेक्षणामध्ये ० ते ६ ,६ ते१४ ,१४ ते १८ या वयोगटातील सर्वेक्षण व माहिती संकलित केली जाणार आहे. सर्व मुलांचे वजन, उंची, रक्तगट, जन्मदिनांक ,गंभीर आजार, दिव्यांग ,इत्यादी सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. सर्व माहितीचा उपयोग कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेसाठी होणार आहे.