शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

येत्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ‘युवा’वर्ग ठरणार ‘हुकमी एक्का’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 12:26 IST

आगामी निवडणुकीत तरुण वर्ग नेमका कुणाच्या पाठीवर ठेवतो पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

ठळक मुद्देमतदारांत ४२ टक्के युवा : पाच वर्षांत मतदार संख्या वाढली सव्वाचार लाखांनी

पुणे : जिल्ह्यामधे मतदारांची संख्या ७३ लाख ६३ हजार ८१२ असून, त्यापैकी ३१ लाख ४० हजार ८१७ (४२ टक्के) मतदार ३९ वर्षाखालील आहेत. तसेच, २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीत मतदारांची संख्या ४ लाख ३६ हजार ६१ ने वाढली आहे. जिल्हा निवडणूक शाखाने वयोगटानुसार दिलेल्या आकडेवारीवरुन मतदारांचा युवा चेहरा समोर आला आहे. जिल्हा निवडणूक शाखाने ३१ जानेवारी २०१९ अखेरीस जिल्ह्यात ३८ लाख ५१ हजार ४४५ पुरुष आणि ३५ लाख १२ हजार २२८ महिला मतदार आहेत. तर, भिन्न लिंगी मतदारांची संख्या १३९ इतकी आहे. जिल्ह्यात पर्वती मतदार संघात सर्वाधिक ३८ भिन्न लिंगीय मतदार असून, पाठोपाठ चिंचवडमध्ये २७ इतकी संख्या आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वर्षांखालील ५४ हजार ११५ आणि २० ते २९ वयोगटातील १२ लाख ७ हजार ९५५ मतदार आहेत. तर त्यावरील मतदारांची संख्या ४२ लाख २२ हजार ९९५ इतकी आहे. त्यातही वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले तब्बल २ लाख ३९ हजार ५६७ मतदार आहेत. जिल्ह्यात ३० ते ३९ या वयोगटातील सर्वाधिक १८ लाख ७८ हजार ७४७ मतदार असून, पाठोपाठ ४० ते ४९ या वयोगटात १६ लाख ६८ हजार ८३७ मतदार येतात. तसेच, ६० ते ५९ वयोगटात ७ लाख ४१ हजार ८२८ आणि ७० ते ७९ वयोगटात ४ लाख २५ हजार ९१० मतदार येतात. ---------------------खडकवासला मतदार संघ तरुणजिल्ह्यात खडकवासला मतदार संघात एकूण ४ लाख ६२ हजार ५७६ मतदार असून, त्यात २९ वर्षांखालील मतदारांची संख्या तब्बल ७५ हजार ७२७ इतकी आहे. त्यात २,५७७ मतदार १८ ते १९ आणि ७३,१४७ मतदार २९ वर्षे वयोगटाखालील आहेत. भोसरी मतदारसंघात २९ वयोगटाखालील ७३,२९९ आणि १८ वयोगटाखालील १,७९२ मतदार आहेत. तर, २९ वर्षांखालील एकूण मतदारांची संख्या ७५,०९१ इतकी भरते. -----------------------जिल्ह्यातील ५४ हजार युवा करणार पहिल्यांदाच मतदानजिल्ह्यातील १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या ५४,११५ इतकी आहे. त्यात ३३,२२३ पुरुष आणि २०,८९० स्त्री मतदार आहेत. त्यातही भोर तालुक्यात सर्वाधिक ४,४११ मतदार १८ ते १९ वयोगटातील आहेत. त्यात पुरुष २,७०६ आणि १,७०५ स्त्री मतदार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPoliticsराजकारण