शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीतील युतीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात : सुधीर मुनगंटीवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:26 IST

युती तोडण्यात भाजपचे नाव येऊ नये तर युती जोडण्यात भाजपचे नाव यावे, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, युती संदर्भातील निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे.

ठळक मुद्दे युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यावाभारतीय जनता पक्ष व शिवसेना समविचारी पक्ष असल्याने त्यांनी एकत्र लढावे, अशी भूमिका

पुणे: आगामी निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेने युती करून एकत्र लढायचे की स्वतंत्र याबाबतचा निर्णय आता शिवसेनेने घ्यायचा आहे. युतीचा निर्णय घेण्याची जबाबदारी भाजपची नाही. शिवसेना एकत्र आली तर एकत्र नाहीतर स्वतंत्र लढण्याचा मार्ग दोघांसाठीही खुला आहे. स्वतंत्र लढलो तरी तितक्याच दिमाखात महाराष्ट्रात पुन्हा निवडून येऊ,असे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी स्पष्ट केले. त्यामुळे युतीचा चेंडू भाजपकडून पुन्हा शिवसेनेच्या कोर्टात टोलाविण्यात आला आहे. वन विभागातर्फे राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.त्याबाबत मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष व शिवसेना दोन्ही एकाच विचाराचे पक्ष असल्याने त्यांनी एकत्र लढावे,अशी भूमिका भाजप पक्षाचा एक कार्यकर्ता व महाराष्ट्राचे हित लक्षात घेवून मी अनेक वेळा मांडली. युती तोडण्यात भाजपचे नाव येऊ नये तर युती जोडण्यात भाजपचे नाव यावे,असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, युती संदर्भातील निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे. शिवसेना एकत्र लढण्यास तयार असेल तर एकत्र निवडणूक लढविली जाईल.शिवसेना बरोबर आली नाही तर भाजप पक्ष एकटा निवडणूक लढवेल आणि महाराष्ट्रत पुन्हा निवडून येईल,असा दावाही मुनगंटीवार यांनी यावेळी केला.दरम्यान, लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा शिवसेनेतर्फे करण्यात आली असली तरी भारतीय जनता पक्षातर्फे शिवसेनेची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून याबाबत प्रयत्न करण्यात आला.मात्र,युती बाबतचा निर्णय आता शिवसेनेने घ्यावा, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपकडून पुन्हा मनधरणी केली जाणार नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक