दिलासा... शुक्रवारी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:10 IST2021-05-01T04:10:25+5:302021-05-01T04:10:25+5:30
पुणे : गुरूवारचा दिवस वगळता गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या शुक्रवारी पुन्हा वाढली आहे़ आज दिवसभरात ...

दिलासा... शुक्रवारी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक
पुणे : गुरूवारचा दिवस वगळता गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या शुक्रवारी पुन्हा वाढली आहे़ आज दिवसभरात ५ हजार १३ जण कोरोनामुक्त झाले असून, नव्या कोरोनाबाधितांची संख्या ४ हजार ११९ इतकी आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१.८ टक्के इतकी आहे़
आज दिवसभरात शहरात ९० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २५ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६५८ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३९१ रूग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २१ लाख २७ हजार १२८ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख १९ हजार ५१८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ६९ हजार ४७७ कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही ४३ हजार २४४ इतकी आहे़