विद्यमान येणार आमने-सामने

By Admin | Updated: October 30, 2016 02:52 IST2016-10-30T02:52:54+5:302016-10-30T02:52:54+5:30

फुलेनगर-नागपूर चाळ या प्रामुख्याने वस्तीभाग समाविष्ट असलेल्या प्रभागामध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ धेंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोगले

Come to the present one face-to-face | विद्यमान येणार आमने-सामने

विद्यमान येणार आमने-सामने

येरवडा : फुलेनगर-नागपूर चाळ या प्रामुख्याने वस्तीभाग समाविष्ट असलेल्या प्रभागामध्ये रिपाइंचे विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ धेंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील गोगले हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. प्रभागातील जनसंपर्क व आतापर्यंत केलेली विकासकामे आदी मुद्द्यांच्या आधारे या प्रभागामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीतील पालखी सोहळ्याचा पुणे शहरातील पहिला विसावा असलेले आदर्श इंदिरानगर तसेच शांतीनगर, नागपूरचाळ, राजीव गांधीनगर, भारतनगर, पंचशीलनगर, चंद्रभागानगर, मोझेनगर, कामगारनगर, श्रमिक वसाहत, एकतानगर आदी वस्तीभाग या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. वस्तीभागातील मतदारांच्या हातामध्ये इच्छुक उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
प्रभाग क्रमांक २ची एकूण मतदारसंख्या ८४ हजार ६७१ इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या १९ हजार ८३३ इतकी तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १४६१ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या प्रभागात मोठ्या प्रमाणात असल्याने याठिकाणी अनुसूचित जातीसाठी दोन जागा आरक्षित ठेवणे आवश्यक असल्याची मागणी राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकच जागा आरक्षित झाली आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना आमने-सामने लढावे लागेल असे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या शीतल सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील गोगले, आरपीआयचे डॉ. सिद्धार्थ धेंडे व सुनंदा देवकर हे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक आहेत.
काही आजी-माजी नगरसेवक पक्षांतर करून पॅनल तयार करणार असल्याची चर्चा सध्या प्रभागात सुरू आहे. या प्रभागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणीय असल्याने मुस्लिम समाजाच्या इच्छुकांनाही प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वसाधारण प्रवर्गातून नानासाहेब नलावडे, राजकुमार ढाकणे, भगवान जाधव, राहुल जाधव, असिफ तांबोळी, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून हर्षद जाधव, सुधीर सरोदे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सुवर्णा संजय कदम इच्छुक आहेत. शिवसेनेकडून सर्वसाधारण प्रवर्गातून माजी नगरसेवक सागर माळकर, सुनील टिंंगरे, यशवंत शिर्के, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून विलास कांबळे तर महिला प्रवर्गातून अर्चना कुचेकर यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसकडून अजय सावंत, जालिंंदर कांबळे, भाजपाकडून सर्वसाधारण प्रवर्गातून चंद्रकांत जंजीरे, सुभाष चव्हाण, संदीप गुंजाळ, अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गातून नीलेश जठार उमेदवारीच्या तयारीत आहेत. लष्कर-ए-भीमाचे सचिन धिवार हेदेखील इच्छुक आहेत.
मनसेकडून अमित जाधव, विजय सूर्यवंशी, महेश शिर्के, भाऊसाहेब प्रक्षाळे, राहुल प्रताप निवडणुकीची तयारी करत आहेत. एकूणच या प्रभागात चारही जागांवर चुरस असणार आहे.
(प्रतिनिधी)

प्रमुख परिसर-
टिंंगरेनगर, आदर्श कॉलनी, नागपूर चाळ, महाराष्ट्र हौसिंंग बोर्ड, शांतीनगर, मोहनवाडी, प्रतीकनगर, इंदिरानगर, फुले नगर, येरवडा कारागृह, येरवडा मेंटल हॉस्पिटल, राम सोसायटी, पंचशीलनगर, माजी सैनिक वसाहत, विश्रांतवाडी पोलीस लाईन, राजीव गांधी वसाहत, कॉमर झोन, येरवडा प्रिझन प्रेस, पुणे गोल्फ क्लब इ.

Web Title: Come to the present one face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.