शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 11:56 IST

आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे, असेही ते म्हणाले.

पुणे : पोर्शे कार अपघातात आमदार सुनील टिंगरे यांनी काहीही केलेले नाही. जो काही चुकीचा तपास झाला तो अधिकाऱ्यांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई होत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. टिंगरे यांची पाठराखण केली. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे, असेही ते म्हणाले.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे. तसे नसते तर दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले नसते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ परदेशात होते. तिथून आल्यावर त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप होतो आहे, या म्हणण्यात तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

पोलिस आयुक्तांना फोन केला नाही अपघात झाल्यानंतर मी पोलिस आयुक्तांना फोन केलेला नाही. ते कुठे होते, मी कुठे होतो कोणाला माहिती नाही आणि लगेचच मी फोन केला असे म्हटले जाते. केला असता तरीही योग्य पद्धतीने तपास करा, कोणाचीही गय करू नका, असेच सांगितले असते, असे अजित पवार म्हणाले. 

शिफारस प्रकरणीही अधिकारी जबाबदारडॉ. तावरे यांची शिफारस टिंगरे यांनीच केली होती, असे लक्षात आणून दिल्यानंतर पवार म्हणाले, आमदार त्यांची कोरी लेटरहेड्स स्वीय सहायकाकडे ठेवून देतात. त्यावर स्वाक्षरी केलेली असते. हे चूक आहे. मात्र, तसे केले जाते, मी स्वत:ही अशी लेटरहेड्स ठेवली आहेत. आम्ही  बदली, बढतीसाठी शिफारस करतो, ते योग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते, असे सांगत अजित पवार यांनी शिफारशीचाही दावा खोडून काढला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणे