शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चीनमधून आलाय ?'; आधी 'कोरोना' नसल्याचे प्रमाणपत्र द्या, मगचं कामावर या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 09:25 IST

चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे.

पुणे : चीनमधून परतलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना काही खासगी कंपन्यांकडून कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र मागितले जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या तक्रारी काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे केल्या आहेत. तसेच काही कंपन्यांकडून संबंधित कर्मचाऱ्यांयांबाबत नेमकी कोणती काळजी घ्यावी, यासंदर्भात विचारणाही केली जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे.चीनमध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. भारतातून शिक्षण, नोकरी, व्यवसाय अन्य कारणांसाठी चीनमध्ये गेलेले बहुतेक जण भारतात परतू लागले आहे. मागील महिनाभरात अनेक भारतीयांनी चीन सोडले आहे. कंपनीच्या कामानिमित्त चीनमध्ये काही कर्मचारी चीनमध्ये जाऊन आले आहेत. आधीच कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या या कर्मचाऱ्यांना आता कंपन्यांकडून कार्यालयात येण्यास मनाई केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. याबाबत एका कर्मचाºयाने आरोग्य विभागाकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. त्यांच्या कंपनीने कोरोना विषाणुची लागण झाली नसल्याचे प्रमाणपत्र रुग्णालयाकडून आणण्यास सांगितले आहे. त्या कर्मचाºयाला कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही कंपनीकडून हे प्रमाणपत्र मागितले आहे. कंपन्यांकडून दक्षता म्हणून हे पाऊल उचलले जात आहे.याविषयी माहिती देताना आरोग्य विभागातील राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, चीनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना हा अनुभव येत आहे. काही जणांनी याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणाही केली आहे. कंपन्यांकडूनही या कर्मचाऱ्यांसंदर्भात  कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती घेतली जात आहे. चीनमधून परतलेल्या कर्मचाºयांना कोणतीही लक्षणे नसल्यास भितीचे कारण नाही. मात्र, संबंधितांनी किमान चौदा दिवस घरीच राहून काळजी घेणे आवश्यक आहे. पण एवढ्या दिवस कंपनीकडून सुट्टी घेतल्यास नोकरीवर परिणाम होऊ शकतो, या भितीने संबंधित कर्मचारी कंपनीत रुजू होण्यासाठी जात आहेत. आरोग्य विभागाकडून त्यांना कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही.  चौदा दिवसांची पगारी रजा द्यावीचीनमधून परतलेल्यांना किमान चौदा दिवस घरातच राहून काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी असतील तर त्यांना चीनमधून परतल्यापासून किमान चौदा दिवसांची पगारी रजा देण्यात यावी. त्यांच्याकडून कोरोना नसल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये. गोपनीयतेच्या कारणास्तव असे प्रमाणपत्र दिले जात आहे.- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग

टॅग्स :corona virusकोरोनाITमाहिती तंत्रज्ञानhinjawadiहिंजवडी