कम्बाइन डिस्ट्रिक्ट उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST2021-02-17T04:14:25+5:302021-02-17T04:14:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यावतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ ...

Combine District Semifinals | कम्बाइन डिस्ट्रिक्ट उपांत्य फेरीत

कम्बाइन डिस्ट्रिक्ट उपांत्य फेरीत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यावतीने आयोजित तिसऱ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित १९ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीच्या सामन्यात ब गटात कम्बाइन डिस्ट्रिक्ट संघाने सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावरील या स्पर्धेत प्रथमेश बाजारे (५-२१) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर कम्बाइन डिस्ट्रिक्ट संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा ९ गडी राखून पराभव केला. कम्बाइन डिस्ट्रिक्ट संघाच्या अचूक माऱ्यापुढे ‘युनायटेड’चा डाव २५.५ षटकांत अवघ्या ८३ धावांवर कोसळला. यात गौरव शिंदेने एकाकी लढत देत ५७ चेंडूत ४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४४ धावा केल्या. गौरवव्यतिरीक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.

‘कम्बाइन’ संघाने ८३ धावांचे आव्हान १३.२ षटकांत एका गड्याच्या बदल्यात ८६ धावा करून पूर्ण केले. यात सलामीची जोडी सचिन धासने ५१ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावा व अनिकेत नलावडेने ३१ चेंडूत २ चौकार व एका षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्या. सामन्याचा मानकरी प्रथमेश बाजारे ठरला.

Web Title: Combine District Semifinals