महापालिकेकडून शनिवारी लसीकरणाची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:27 IST2021-01-08T04:27:28+5:302021-01-08T04:27:28+5:30

पुणे : कोरोनावरील लसीकरणाची महापालिकेकडून येत्या शनिवारी (दि. ९ जानेवारी) रंगीत तालीम होणार आहे़ महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात ...

Colorful training on vaccination on Saturday by the Municipal Corporation | महापालिकेकडून शनिवारी लसीकरणाची रंगीत तालीम

महापालिकेकडून शनिवारी लसीकरणाची रंगीत तालीम

पुणे : कोरोनावरील लसीकरणाची महापालिकेकडून येत्या शनिवारी (दि. ९ जानेवारी) रंगीत तालीम होणार आहे़ महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात (येरवडा) ही रंगीत तालीम होणार असून यासाठी २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलविण्यात आले आहे़

राज्य शासनाकडून यापूर्वी पुण्यात पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीतील माण प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा औंध रुग्णालयात २ जानेवारीला लसीकरणाची रंगीत तालीम झाली होती.

या रंगीत तालमीमध्ये रंगीत लसीकरण बूथवर सुरक्षा रक्षक, डाटा एंट्री ऑपरेटर, लस टोचक या पाच जणांचा समावेश असणार आहे. हे मनुष्यबळ पुरविण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे. यात लस टोचणे वगळता इतर सर्व प्रक्रिया होणार असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी दिली़

Web Title: Colorful training on vaccination on Saturday by the Municipal Corporation