समितीच्या अहवालानंतर महाविद्यालये सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:10 IST2020-12-22T04:10:41+5:302020-12-22T04:10:41+5:30
पुणे: कोरोनानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यासाठी समिती स्थापन केली असून या ...

समितीच्या अहवालानंतर महाविद्यालये सुरू होणार
पुणे: कोरोनानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक नियमावली तयार करण्यासाठी समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू होणार आहेत. त्यामुळे लवकरच महाविद्यालयांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले होईल,अशी आशा निर्माण झाली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या पूर्वीच झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीत महाविद्यालये सुरू करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र,या समितीला विद्यापीठाकडून पत्र प्राप्त न झाल्याने समितीची एकही बैैठक झाली नाही. परंतु, सोमवारी (दि.21)झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैैठकीत गायकवाड यांच्या समितीने लवकर अहवाल सादर करावा,अशी चर्चा झाली.तसेच समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारून महाविद्यालये सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल,असे निश्चित करण्यात आले.
महाविद्यालये सुरू करण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने आपला अहवाल लवकर सादर करावा,असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत निश्चित करण्यात आले.तसेच समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर महाविद्यालये सुरू करण्याचा ठराव करण्यात आला.
- डॉ.प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ