महाविद्यालये सोमवारी उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:11+5:302021-01-08T04:33:11+5:30
कोरोना काळात बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सोमवारी ...

महाविद्यालये सोमवारी उघडणार
कोरोना काळात बंद असलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. सोमवारी विद्यापीठात या समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर महाविद्यालये ११ तारखेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत पदवी व पदव्युत्तरचे अध्यापनाचे काम ऑनलाईन माध्यमातून सुरू होते. त्यामुळे बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राचे अध्यापन जवळपास पुर्ण झाले आहे. आता या अभ्यासक्रमांची प्रात्यक्षिके ११ तारखेला महाविद्यालये उघडल्यानंतर सुरू होतील. प्रात्यक्षिके पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या लेखी परीक्षा होतील. प्रात्यक्षिके नसलेल्या अभ्यासक्रमांचे वर्गही ११ तारखेपासून सुरू होणार आहेत. प्रथम सत्राच्या परीक्षा झाल्यानंतर लगेचच दुसºया सत्राचे ऑफलाईन अध्यापन सुरू करणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
----
व्यावसायिक अभ्यासक्रम नंतर
सीईटीमधून प्रवेश होत असलेले अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया अद्याप पुर्ण झालेली नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमांचे वर्ग ११ तारखेपासून सुरू होणार नाहीत. ही प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या संबंधित प्राधिकरणाकडून वर्ग सुरू करण्याच्या तारखा जाहीर केल्यानंतरच त्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.