शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: गडचिरोलीतून गांजा विक्रीसाठी पुण्यात आलेल्या महाविद्यालयीन तरुणांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:06 IST

तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता भागात पकडले...

पुणे :गडचिरोली, भंडारा जिल्ह्यातून गांजा घेऊन शहरात विक्रीसाठी आलेल्या तीन महाविद्यालयीन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नगर रस्ता भागात पकडले. त्यांच्याकडून ११ लाख १४ हजार रुपये किमतीचा ५५ किलो गांजा, तीन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.

राम राजेश बैस (वय २०, रा. रामपुरी वाॅर्ड, गडचिरोली), ऋतिक कैलास टेंभुर्णे (वय २१, रा. गौराळा, ता. लाखुंदर, जि. भंडारा), निकेश पितांबर अनोले (वय २२, रा. कस्तुरबा वाॅर्ड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक नगर रस्त्यावरील खराडी भागात रविवारी गस्त घालत होते. त्यावेळी तिघे जण गडचिरोलीतून गांजा घेऊन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे यांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी खराडी बाह्यवळण मार्गावर सापळा लावून तिघांना पकडले. त्यांच्याकडील बॅगेमध्ये पोलिसांनी ५५ किलो गांजा आणि ३ मोबाइल असा ११ लाख ७० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक फौजदार शिवाजी घुले, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, संतोष देशपांडे, संदीप जाधव आदींनी ही कारवाई केली.

टॅग्स :PuneपुणेGadchiroliगडचिरोली