शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मान्यता नसलेले प्राचार्य चालवतायेत कॉलेज,नोरोसजी वाडिया महाविद्यालयातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:37 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली काही महाविद्यालये विद्यापीठाची मान्यता नसलेल्या प्राचार्यांकडून चालवली जात आहेत

राहुल शिंदे पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली काही महाविद्यालये विद्यापीठाची मान्यता नसलेल्या प्राचार्यांकडून चालवली जात आहेत. त्यात प्राचार्यपद हे एकाकी असल्याने खुल्या संवर्गातून भरण्यात यावे यासाठी न्यायालयात जाणाºया मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वाडिया महाविद्यालयाचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ महाविद्यलायाचेच नाही तर विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांपैकी एक म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नौरोसजी वाडिया कॉलेजकडे पाहिले जाते. परंतु, गेल्या चार वर्षांहून अधिक कालावधीपासून प्रभारी प्राचार्यांकडून या महाविद्यालयाचे कामकाज केले जात आहे. विद्यापीठाने वाडिया महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दोन वर्षे प्रभारी प्राचार्यपदासाठी मान्यता दिली होती. त्यानंतर प्रभारी प्राचार्यांची मान्यता नाकारली. मात्र, सुमारे तीन वर्षांपासून विद्यापीठची मान्यता नसणाºया व्यक्तीकडून विद्यालयाचे आर्थिक व शैक्षणिक व्यवहार चालविले जात आहेत. त्यावर राज्याच्या उच्च शिक्षण विभागासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आक्षेप घेतले. तरीही संस्थेने त्याची फारशी दखल घेतली नाही. परिणामी विद्यापीठाची मान्यता नसलेल्या अध्यापकाच्या स्वाक्षरीने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे होणारा प्रशासकीय व वित्तीय बाबींचा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही, असे पत्र सहसंचालक कार्यालयातर्फे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सचिवांना पाठविण्यात आले.विद्यापीठाने दोन वर्षे प्रभारी प्राचार्यांना मान्यता देऊन त्यानुसार सर्व शैक्षणिक व आर्थिक कामकाज सुरू ठेवले. मात्र, प्राचार्यपद भरण्याबाबत हालचाली केल्या जात नसल्याने विद्यापीठाकडून दिल्या जाणाºया विविध मान्यता थांबविण्यात आल्या. विद्यापीठातर्फे सुमारे तीन वर्षांपासून या महाविद्यालयाच्या नवीन तुकड्यांना, विषयांना, अभ्यासक्रमांना, संशोधन केंद्रांना तसेच प्रयोगशाळांना मान्यता दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. नौरोसजी वाडिया महाविद्यालयच्या प्रभारी प्राचार्य पदाची जबाबदारी सध्या डॉ. के. एस. व्यंकटराघवन यांच्याकडे आहे. परंतु, आमच्या दृष्टीने व्यंकटराघवन हे प्राचार्य नाहीत, असे विद्यापीठातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून सध्या आर्थिक व शैक्षणिक व्यवहार केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांचे प्रथम वर्षाचे प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला. हाच नियम वाडिया कॉलेजलासुद्धा लागू होतो. परंतु, विद्यापीठाने यासंदर्भात कार्यवाही केल्याचे नाही. सध्या नवीन तुकड्या व अभ्यासक्रमांना मान्यता न देण्याचे विद्यापीठाचे धोरण आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकPuneपुणे