शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

महाविद्यालय निवडणूक : विद्यार्थी निवडणुकांसाठी मतमोजणीची वेगळी पध्दत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 13:10 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देमतपत्रिकेवर निवडणुक लढणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची नावे इंग्रजी वर्णमालेनुसार नमूद असणारविद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक महाविद्यालयात मतदान केंद्र विद्यार्थ्यांना अशा लहान-मोठ्या नियमांचा सखोलपणे अभ्यास करावा लागणार

पुणे: विद्यार्थी निवडणुक प्रक्रियेत मतपत्रिकेवर उमेदवारांचे प्रसंतीक्रम दिले जाणार आहेत.त्यामुळे या मतपत्रिकांची मतमोजणी वेगळ्या पध्दतीने होणार आहे.परिणामी निवडणुक लढविणाऱ्या विद्यार्थ्यांना निवडून येण्यासाठी सर्व प्रथम मतदानाची व मतमोजणीची प्रक्रिया कोणत्या पध्दतीने होणार हे समजावून घ्यावे लागेल.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मात्र,लोकसभा,विधानसभा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे आणि त्यांचे चिन्ह दिले जाते.त्यानुसार विद्यार्थी निवडणुकांसाठी मतपत्रिका असणार नाहीत.तर मतपत्रिकेवर निवडणुक लढणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांची नावे इंग्रजी वर्णमालेनुसार नमूद केली जातील.त्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थी मतदार मतपत्रिकेवर आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर १, २, ३..., असे पसंती क्रम देतील.विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी प्रत्येक महाविद्यालयात मतदान केंद्र असेल.मतदान प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर मोहरबंद मतपेट्या संबंधित अभिलेखासह विद्यापीठात नेण्यात येतील.विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी मतदानाच्या तिसऱ्या दिवशी सुरू केली जाईल.तसेच मतमोजणीच्या सलग प्रक्रियेनंतर निकाल घोषित केला जाईल. निवडणुक अधिकारी किंवा त्यांनी नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती मतपत्रिकांची छाननी करतील. तसेच मतपत्रिकांची मोजणी केल्यानंतर मतपत्रिकांची तपासणी करतील. प्रत्येक उमेदवारासाठी नोंदविलेल्या पहिल्या पसंतीक्रमानुसार आणि अवैध ठरलेल्या मतपत्रिका नाकारून गठ्ठ्यामध्ये त्याची विभागणी करतील. त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी उमेदवारांसाठी प्रथम पसंतीक्रम नोंदविलेल्या वैध मतांच्या संख्येइतकी मते प्रत्येक मतदारास देईल. निवडणुक अधिकारी वैध मतपत्रिकांच्या एकूण संख्येसंबंधी माहिती संकलीत करतील आणि आवश्यक मते (कोटा) निश्चित करतील.मतमोजणीच्या वेळी केवळ उमेदवार किंवा त्याने सुचविलेला व्यक्तीच मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहू शकेल. मतमोजणीच्या कोणत्याही फेरी अखेर ज्या उमेदवाराकडे मतांची संख्या ही,आवश्यक मतांइतकी (कोटा) किंवा त्यापेक्षा जास्त असेल, त्या उमेदवारास विषयी घोषीत केली जाईल. एकापेक्षा उमेदवारांना अधिकची मते मिळालेली असतील तर ज्याला जास्त अधिकची मते मिळाली असतील त्याचा पहिल्यांदा विचार केला जाईल,त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा लहान-मोठ्या नियमांचा सखोलपणे अभ्यास करावा लागेल.त्याशिवाय मतमोजणी योग्य पध्दतीने सुरू आहे किंवा नाही? हे समजू शकणार नाही.---महाविद्यालयीन निवडणुकांची मतमोजणीची प्रक्रिया त्याचप्रमाणे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या मतमोजणीची प्रक्रिया समजावून घेतल्या शिवाय विद्यार्थ्यांना निवडणुकीत विजयी होता येणार नाही.तसेच प्रचार करताना मतदारांनी कोणत्या पध्दतीने मतदान करावे,हे समजावून सांगावे लागणार आहे.परिणामी विद्यार्थ्यांना मतदानाच्या व मतमोजणीच्या पध्दतीचा अभ्यास करावा लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयElectionनिवडणूक