जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले जेसीबीचे स्टेअरिंग हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST2021-03-15T04:09:50+5:302021-03-15T04:09:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : मेडद येथील पाणंद रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी थेट ...

The Collector took the steering wheel of JCB | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले जेसीबीचे स्टेअरिंग हाती

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले जेसीबीचे स्टेअरिंग हाती

लोकमत न्यूज नेटवर्क

बारामती : मेडद येथील पाणंद रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी थेट जेसीबी मशिनचे स्टेअरिंग हाती घेऊन पाणंद रस्त्यावरील काटेरी झुडपे हटविली. उद्घाटनाच्या या वेगळ्या स्टाईलने सर्वच आश्चर्यचकित झाले.

मेडद येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ‘शरद पवार ग्रामसमृद्धी योजने’च्या माध्यमातून येथील आरटीओ कार्यालयापासून ते कऱ्हा नदी बंधाऱ्यापर्यंतच्या पाणंद रस्त्याच्या दुरूस्तीस सुरूवात करण्यात आली. रविवारी (दि.१४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख देखील उपस्थित होते. यावेळी मेडद येथे पाणंद रस्ताचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी ग्रामस्थांच्या वतीने सजवलेल्या बैलगाडीतून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख कार्यक्रमस्थळापर्यंत आणले. यावेळी बैलगाडीचे सारथ्यदेखील जिल्हाधिकारी देशमुख यांनी केले. उद्घाटनावेळी जिल्हाधिका-यांनी स्वत: जेसीबी मशिन चालवून पाणंद रस्त्याचे काम सुरु केले. पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतंर्गत बारामती मधे एकूण १३३ रस्ते लांबी १८९ किमी प्रस्तावित केले असून १३ कामे लांबी १४ किमी पूर्ण झाले आहेत ही सर्व कामे लोकसहभागातून होणार आहेत मे महिनाअखेर सर्व पूर्ण होतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

फोटो ओळी : मेडद येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: जेसीबी मशिन चालवून केले.

१४०३२०२१-बारामती-१४

--------------------------

फोटो ओळी : बैलगाडीचे सारथ्य करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

१४०३२०२१-बारामती-१५

----------------------------

Web Title: The Collector took the steering wheel of JCB