सामुहिक दुग्धपानाने कोजागरीस खुमारी

By Admin | Updated: October 28, 2015 01:21 IST2015-10-28T01:21:31+5:302015-10-28T01:21:31+5:30

मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते

Collected lactation kojagarias pus | सामुहिक दुग्धपानाने कोजागरीस खुमारी

सामुहिक दुग्धपानाने कोजागरीस खुमारी

मावळ : मावळ तालुक्यातील गावागावात सोमवारी रात्री कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. विविध मंडळांनी सामुदायिक दुग्धपान कार्यक्रम आयोजित केले होते. गप्पा-टप्पा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुग्धपानाची खुमारी वाढली.
तळेगावात सांस्कृतिक कार्यक्रम
तळेगाव स्टेशन : तळेगाव आणि स्टेशन विभागातील उपनगरांत गणेश मंडळांतर्फे विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जल्लोषात कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे चंद्रदर्शन न झाल्याने मात्र नागरिकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. स्टेशनच्या यशवंतनगरातील छत्रपती शिवाजी चौकात शिवशक्ती मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले.
वराळे येथील बालाजी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्र महोत्सवाची सांगता कोजागरीच्या दिवशी विविध कार्यक्रमांनी झाली. शिवशक्ती मंडळातर्फे नवरात्रोत्सवाची सांगता कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली.
उदयोन्मुख बालकलाकार, तरुण कलाकारांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. विविध स्पर्धांचे बक्षीसवितरण माजी नगरसेवक अशोक भेगडे,अजिंक्य भेगडे, अनिकेत भेगडे, अशोक चौधरी, योगेश घोडके, अमीन शेख, दीपक वडगामा आदींंच्या हस्ते झाले. मंडळाचे अध्यक्ष अनिकेत भेगडे यांनी या वेळी गरजू कलाकारांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली. मसाला दुधाचे वाटप झाले. कार्यक्रमस्थळी स्वच्छता अभियान राबवून ते चकाचक बनविण्यात आले. सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले. बालाजी मित्र मंडळाच्या वतीने कोजागरीला नृत्यकला स्पर्धा, नवरात्रीत झालेल्या संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, खेळ रंगला पैठणीचा आदी स्पर्धांचे बक्षीसवितरण आणि दूधवाटप कार्यक्रम घेण्यात आला. खेळ रंगला पैठणीच्या स्पर्धेत नयना भोकसे,सोन्याची नथ-छाया टास्के त्याचप्रमाणे फॅन्सी ड्रेस स्पर्धेत साई सिन्नरकर विजेते ठरले.
राम भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष विनोद फुले, अमर मराठे,राहुल शेलार, गौरव लोंढे, सागर वाघ,किरण भोसले,दत्ता वाळुंज, मोरेश्वर मराठे, सोमनाथ कोयते, समीर बनसोडे, ज्योती कोयते, प्रिया भेगडे, मंजिरी यादव, कविता आवटे, अर्चना काटे यांनी सहकार्य केले. वनिता वारिंगे यांनी सूत्रसंचालन केले.
इंद्रायणी विद्यामंदिर कॉलनीत इंद्रायणी मित्र मंडळाच्या वतीने महिलांच्या मनोरंजनाचे आणि खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गाव विभागात डाळ आळी येथील गणेश मंदिरासमोर जय बजरंग मंडळातर्फे दांडिया आणि दूध वाटप झाले. (वार्ताहर)

Web Title: Collected lactation kojagarias pus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.