आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड

By Admin | Updated: August 7, 2014 23:13 IST2014-08-07T23:13:24+5:302014-08-07T23:13:24+5:30

आंबेगाव तालुक्यात आहुपे गावाच्या खाली असलेल्या साखरमाचीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

A collapse of ahppe sugar | आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड

आहुपेच्या साखरमाचीत कोसळली दरड

>घोडेगाव : आंबेगाव तालुक्यात आहुपे गावाच्या खाली असलेल्या साखरमाचीजवळ दरड कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र साखरमाचीकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे. भात खाचरे गाडली गेली तसेच घरांना तडे गेले आहेत. दरम्यान, येथील सुमारे 4क् ग्रामस्थांना मुरबाड तालुक्यातील उचले गावात स्थलांतरित करण्यात आले आहे. 
साखरमाचीमध्ये दरड कोसळल्याची बातमी बुधवारी (दि. 6) सकाळी आली. माळीण दुर्घटनेतून थोडे सावरत असलेले प्रशासन व पोलीस यंत्रणा पुन्हा खडबडून जागी झाली. येथे दूरध्वनीद्वारे संपर्क होत नसल्याने कोणाचे काय झाले हे समजत नव्हते. शाश्वत संस्थेचे आनंद कपूर व बाजार समितीचे सभापती प्रकाश घोलप यांचा दिनेश येंधे या ग्रामस्थाशी मोबाईलवर संपर्क झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार, साखरमाचीच्या खालच्या बाजूला दरड कोसळली.  त्यामुळे रस्ता पूर्ण बंद झाला आहे. आम्ही काही ग्रामस्थ रस्ता काढत काढत उचल्यात पोहचलो आहोत.  मोठी दरड कोसळल्यामुळे भात खाचरे गाडली गेली आहेत. तसेच काही घरांना तडे गेले आहेत. काही ग्रामस्थ अजूनही गावात अडकले असून, आम्ही काही लोक खाली उचल्यामध्ये मदतीसाठी आलो आहोत, असे त्याने सांगितले.
दरम्यान, उचले गावातील काही लोक साखरमाचीत अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी गेले आहेत.  यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे साखरमाचीर्पयत पोहचणो अवघड झाले आहे. साखरमाचीतील सर्व ग्रामस्थांना मदत करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील जिल्हा प्रशासनाला आंबेगावमधील पोलीस व महसूल विभागाने सूचित केले आहे.  विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही साखरमाची ग्रामस्थांना सुरक्षित करण्यासाठी व त्यांची उचले गावात राहणो व खाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासन यंत्रणोला सूचित केले आहे. घोडेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच प्रकाश घोलप, ह.भ.प. पांडुरंग महाराज येवले, जनाबाई उगले यांनी आहुपे गावात जाऊन साखरमाचीमधील परिस्थिती येथील ग्रामस्थांकडून समजून घेतली व आहुपे ग्रामस्थांनाही धीर दिला. (वार्ताहर)
 
2007 पासून या गावच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु आहे. मागील महिन्यात आंबेगावचे तहसीलदार डी.जी. गोरे यांनी या गावाला भेट देऊन रेशनकार्डवरून कुटुंबियांचे सर्वेक्षण केले. लवकरच या गावचे ठाणो जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सिद्धगडवाडी येथे पुनर्वसन होणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
 
4दरम्यान जुलै 2क्क्7 मध्येही साखरमाची गावाच्या दक्षिण बाजूला खूप मोठी दरड कोसळली होती. तेव्हाही साखरमाची गाव दरडीखाली गाडले गेल्याची बातमी घोडेगावला आली होती. तेव्हाचे प्रांताधिकारी गजानन पाटील व तहसीलदार व आताचे प्रांत अधिकारी डी.बी. कवितके यांनी सर्व मदतकार्य घेऊन साखरमाचीत गेले होते. मात्र साखरमाचीवर नव्हे तर साखरमाचीच्या बाजूला दरड पडल्याचे तेथे गेल्यानंतर निदर्शनास आले. 
 
4साखरमाची ही अवघी 12 ते 15 कुटुंबे असलेली वाडी. पुणो व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर आहुपे ते तळकोकण अशा एक हजार दोनशे मीटर उंच कडय़ाच्या मधोमध वसली आहे. 
4येथे पोहचण्यासाठी आहुपेमधून बैलघाट उतरून पायी दीड ते दोन तासात पोहचता येते. हा कडा उतरणो नवख्या माणसाला मोठे आव्हान आहे. 
4अशा अवघड ठिकाणी ही वाडी असल्याने येथे वीज पोहचू शकत नाही अगर रस्ताही होऊ शकत नाही. मात्र शेतीसाठी लोक येथे वर्षानुवर्षे राहत आहेत. 
 

Web Title: A collapse of ahppe sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.