वृत्तपत्राच्या साह्याने साकारले क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कोलाज चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:36+5:302021-01-08T04:31:36+5:30
सासवड : सासवडचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगावलीकार सोमनाथ भोंगळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केवळ वर्तमानपत्रांच्या साह्याने ...

वृत्तपत्राच्या साह्याने साकारले क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कोलाज चित्र
सासवड : सासवडचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगावलीकार सोमनाथ भोंगळे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केवळ वर्तमानपत्रांच्या साह्याने २५ बाय ३० फूट आकाराचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कोलाज चित्र साकारले आहे. येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कमलाबाई मुथा कन्या प्रशालेत भोंगळे यांनी तब्बल दोन दिवस राबून, सुमारे १५ किलो वर्तमानपत्र आणि १५ किलो पेस्टचा वापर करत ही भव्य कलाकृती सादर केली आहे.
मयूर दुधाळ, आविष्कार भोंगळे, अभिषेक शिंदे, पायल गिरमे, मयूरी गिरमे आणि प्रेम गिरमे या सहकलाकारांनी भोंगळे यांच्यासमवेत या उपक्रमात सहभाग नोंदवला. सोमनाथ भोंगळे व सह कलाकारांनी लॉकडाऊनच्या काळात आषाढ महिन्यात " आठवणीतील वारी " यातून आषाढ वारीतील प्रसंग रांगोळीतून मांडले होते. त्यामध्ये लहान मुलं, वृद्ध वारकरी, उभे रिंगण, हेलिकॉफ्टरमधून माऊलींची पंढरीची वारी आदी चित्रे चित्रित केली होती. लॉकडाऊनच्या काळातही वारकऱ्यांना वारीचा आनंद या चित्राकृतीतून अनुभवता आला होता. चित्रकार, रंगावलीकार भोंगळे यांना अनेक पुरस्कार मिळाले असून फिल्मस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी काढत असलेल्या रांगोळीतील प्रतिमा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते.
सासवड येथील रंगवलीकार सोमनाथ भोंगळे यांनी वर्तमानपत्रांतून साकारलेले क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे कोलाज चित्र.