शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे गारठले! 'एनडीए'मध्ये किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 12:31 IST

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका जसा वाढला तशी पुण्यातही थंडी वाढली आहे.

ठळक मुद्देएनडीए आणि किरकीटवाडी अनुक्रमे ९.७ अंश सेल्सिअस व १०.९ अंश सेल्सिअस

पुणे : राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका वाढला असून जिल्ह्याच्या विविध भागात बसविण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्र किमान तापमान वेगवेगळे दाखविले असून सर्वात कमी किमान तापमान एनडीए येथील स्वयंचलित हवामान केंद्रात ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याचवेळी शिवाजीनगर येथे ११.३ अंश सेल्सिअस, लोहगाव येथे १२.७ अंश सेल्सिअस तसेच  पाषाण येथे ११.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले आहे. 

शहर व परिसरात हवामान विभागाने काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी केली आहे. ती प्रामुख्याने प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे. याशिवाय अक्षय मेजरमेंट यांच्या किरकिटवाडी येथे मंगळवारी सकाळी किमान तापमान १०.९ आणि कात्रज येथे ११.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका जसा वाढला तशी पुण्यातही थंडी वाढली आहे. सायंकाळनंतर थंड वारे वाहण्यास सुरवात होते. त्यामुळे रात्री अनेक ठिकाणी शेकोट्या पेटण्यास सुरुवात झाली आहे. मोकळ्या जागेत व आसपास गर्द झाडी असेल त्या भागात थंडीचे प्रमाण अधिकच जाणवत आहे.

हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्येही त्या त्या भागात किमान तापमान वेगवेगळे नोंदविले गेल्याचे दिसून येते. मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर मंगळवारी सकाळी पुण्यातील विविध भागातील किमान तापमान टिष्ट्वट केले. त्यात शिवाजीनगर ११.२, राजगुरुनगर १०.७, तळेगाव ११.३, एनडीए ९.७, पाषाण ११.८ अंश सेल्सिअस असल्याचे म्हटले आहे.

एनडीए आणि किरकीटवाडी येथे आज अनुक्रमे ९.७ अंश सेल्सिअस आणि १०.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचे दाखविण्यात येत आहे. एकाच ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या नोंदीमुळे तेथे नेमके किती तापमान होते, याविषयी संभ्रम निर्माण होत आहे.  याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, एनडीए येथे बसविण्यात आलेले स्वयंचलित हवामान केंद्र हे प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी प्रामुख्याने त्याचा उपयोग करण्यात येतो. हवामानाची नोंद करण्यासाठी आयएमडीच्या नियमानुसार जमिनीपासून १.३३ मीटर अथवा ४ फुटावर बसविण्यात आलेल्या थॅमामीटरद्वारे हवामानाची नोंद केली जाते. शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण येथे या सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन व त्याची नियमित देखभाल करुन हवामानाची नोंद केली जाते. त्यामुळे या तीन ठिकाणच्या हवामानाच्या नोंदी अधिकृत समजल्या जातात.

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnda puneएनडीए पुणे