थंडीची चाहूल; पारा उतरु लागला
By Admin | Updated: November 2, 2015 01:13 IST2015-11-02T01:13:26+5:302015-11-02T01:13:26+5:30
दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री आल्हाददायक गारवा असे वातावरण सध्या पुणेकर अनुभवत असून, नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी थंडीची चाहूल शहरात दिसून येत

थंडीची चाहूल; पारा उतरु लागला
पुणे : दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री आल्हाददायक गारवा असे वातावरण सध्या पुणेकर अनुभवत असून, नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी थंडीची चाहूल शहरात दिसून येत होती़ किमान तापमान १७़४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे़
आॅक्टोबर हिट दिवसा अजूनही जाणवत असून, कमाल तापमान ३१़४ अंश सेल्सिअस होते़ सरासरीपेक्षा ते किंचित जास्त आहे़ त्यामुळे रस्त्यावरून जाताना उन्हाचा चटका जाणवत होता़ सायंकाळनंतर गारवा जाणवू लागला आहे़ पहाटेही दाट धुके पडू लागले आहे़ सकाळी फिरायला जाणाऱ्यांनी कानटोपी, स्वेटर बाहेर काढलेले दिसू लागले आहेत़ राज्यात आज सर्वांत कमी किमान तापमान नांदेड येथे १५़५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले़ पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश सामान्यत: ढगाळ होण्याची शक्यता असून, कमाल व किमान तापमान ३१ व १७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़ (प्रतिनिधी)