शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

नाण्यांमध्ये इतिहास, संस्कृतीची गुंफण : प्रशांत कुलकर्णी; ‘कॉईनेक्स पुणे २०१७’ राष्ट्रीय प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:28 PM

नाण्यांमध्ये इतिहास आणि संस्कृतीचे गुंफण आढळून येत आहे, असे मत ज्येष्ठ नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि संग्राहक प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देगेल्या २१ वर्षांपासून आयोजित करण्यात येते नाण्यांचे प्रदर्शननाणे संग्राहक अरविंद आठवले आणि रण विजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : लिखित इतिहास किंवा त्या काळातील प्रचलित नाणेच तत्कालीन संस्कृती आणि इतिहासाचे खरे चित्र उभे करू शकते. नाणे संग्राहकांनी नाणे संवर्धनाच्या माध्यमातून इतिहास आणि त्या काळातील संस्कृतीचेच संवर्धन केले आहे. कारण नाण्यांमध्ये इतिहास आणि संस्कृतीचे गुंफण आढळून येत आहे, असे मत ज्येष्ठ नाणकशास्त्र तज्ज्ञ आणि संग्राहक प्रशांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी आॅफ रेअर आयटम्सतर्फे  दरवर्षीप्रमाणे कॉईनेक्स पुणे २०१७ या राष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन सोनल हॉल कर्वे रोड येथे करण्यात आले आहे. या वेळी सोसायटीचे प्रेसिडेंट नरेंद्र टोले, व्हाईस प्रेसिडेंट राजेंद्र शहा, चेअरमन रवींद्र दोशी, सेक्रेटरी शरद बोरा, खजिनदार आणि प्रदर्शनाचे समन्वयक नितीन मेहता आणि बस्ती सोळंकी उपस्थित होते. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी आॅफ रेअर आयटम्सतर्फे गेल्या २१ वर्षांपासून नाण्यांचे हे प्रदर्शन आयोजित करण्यात येते. यंदा या प्रदर्शनाचे २२वे वर्ष आहे. या वेळी नाणे संग्रह या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील नाणे संग्राहक अरविंद आठवले आणि लखनो येथील नाणे संग्राहक रण विजय सिंग यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी भारतातील नाणे तज्ज्ञांच्या लेखांचा समावेश असलेल्या कॉईनेक्स पुणे २०१७ या प्रदर्शनावर आधारित एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच या वेळी औरंगाबादचे आशुतोष पाटीललिखित ‘पश्चिमी क्षत्रपांची नाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कुलकर्णी म्हणाले, काही नाण्यांवर वडिलांऐवजी आईची नावे कोरलेली आहेत. यावरून त्या काळात स्त्रियांना दिला जाणारा मान आणि स्त्रीप्रधान संस्कृतीवर प्रकाश टाकला जातो. हा स्त्रीप्रधान समाज आणि समाजव्यवस्था नाण्यांच्या रूपाने जतन केला गेला आहे. गार्गी, मैत्रयी, नागणिका अशी अनेक सशक्त स्त्रीप्रधान संस्कृतीची उदाहरणे आपणास नाण्यांच्या माध्यमातून दिसून येतात. पूर्वी नाणे संग्राहकाला कुटुंबापासून ते समाजापर्यंत सर्वच जण वेड्यात काढायचे. अगदी नाणे संग्राहकाच्या घरी सोयरीक करायलादेखील समाज तयार नसायचा. नाणे संग्राहकाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जायचे. परंतु आता बऱ्याच नाणे संग्राहकांना संस्थांमार्फत एक व्यसापीठ प्राप्त झाले आहे. तसेच जीएसटी अ‍ॅक्टमध्येदेखील याचा समावेश झाल्याने त्याला इंडस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या छंदाला दर्जा प्राप्त झाला आहे. नाणे संग्राहकांना सन्मान आणि दर्जा प्राप्त करून देण्यात आॅक्शन्स हाऊसेसचादेखील सिंहाचा वाटा आहे. आता नाणे संग्रह हा गुंतवणुकीचा देखील एक चांगला पर्याय म्हणून उपलब्ध झाला आहे. सोसायटीचे चेअरमन रवींद्र दोशी यांनी प्रास्ताविक केले. बस्ती सोळंकी यांनी सूत्रसंचलन केले. नितीन मेहता यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे