शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

सहकारी संस्थांना खासगी पुरस्कार स्वीकारण्यावर बंधन : सहकार आयुक्तालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:18 IST

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम २४ नुसार सहकारी संस्थांचे सभासद, अधिकारी, कर्मचारी यांना सहकाराचे प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देखासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेतले जात असल्याच्या तक्रारी सहकार आयुक्तालयाकडे दाखल

पुणे : सहकारी संस्थांनी मान्यताप्राप्त संस्था वगळता इतर खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेऊ नये, असे आदेश सहकार आयुक्तालयाने दिले आहेत. तसेच खासगी कंपन्यांकडून दिले जाणारे पुरस्कार देखील संस्थांनी स्वीकारु नये, असे आदेशात म्हटले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम २४ नुसार सहकारी संस्थांचे सभासद, अधिकारी, कर्मचारी यांना सहकाराचे प्रशिक्षण देणे बंधनकारक आहे. त्यासाठी राज्य संघीय संस्था आणि राज्य शिखर प्रशिक्षण संस्थेला प्राधिकृत करण्यात आले आहे. मात्र, या संस्थांव्यतिरिक्त खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेतले जात असल्याच्या तक्रारी सहकार आयुक्तालयाकडे दाखल झाल्या आहेत. अशा खासगी संस्थांकडून प्रशिक्षण घेणे गैर असल्याचे आदेशात म्हटले आहे. सहकारी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्थांना सरकारकडून पुरस्कार देण्यात येतो. मात्र, काही सहकारी संस्था खासगी संस्थांचा पुरस्कार स्वीकारत अहेत. अशा पुरस्कार कार्यक्रमांना सहकारी संस्थांकडून प्रायोजकत्व दिले जाते. त्यावर अवाजवी खर्च केला जात असल्याचे समोर आले आहे. अशा कार्यपद्धतीमुळे सभासद-ठेवीदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. खासगी संस्थांच्या पुरस्काराच्या निकषांवर सरकारचे नियंत्रण नसते. सहकार चळवळीची सध्याची स्थिती पाहिल्यास (पतसंस्था व नागरी बँका) खासगी पुरस्कारांना प्रतिबंध करणे आणि मान्यता प्राप्त संस्थांकडून प्रशिक्षण घेणे योग्य असल्याची भूमिका सहाय्यक आयुक्तालयाने काढलेल्या पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित विभागातील विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, सहाय्यक उपनिबंधक यांनी संबंधित सहकारी संस्थांमध्ये याची अंमलबजावणी करावी. तसेच, लेखापरीक्षण अहवालात शिक्षण-प्रशिक्षण व खासगी संस्थांकडून पुरस्कार स्वीकारल्याचा उल्लेख नमूद करावा. तसेच, लेखापरिक्षण छाननी अहवालातही त्याची नोंद घ्यावी असे आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र