शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 03:52 IST

संकेतस्थळ निर्मितीला मान्यता : संपूर्ण निवडणूक आॅनलाईन होण्यासाठी पहिले पाऊल

पुणे : सहकार निवडणूक प्राधिकरणामार्फत घेण्यात येणाऱ्या सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया आॅनलाइन होणार आहे. राज्य सरकारने प्राधिकरणाचे संकेतस्थळ तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली असून, महाआयटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून येत्या सहा महिन्यात संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यामधे २ लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. सहकारी गृहसंस्था, सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बँका, सूत गिरण्या, दूध उत्पादक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा विविध सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. दर पाच वर्षांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, आरक्षण करणे, मतदार याद्या प्रसिद्ध करणे, नामनिर्देशनपत्र घेणे आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी प्राधिकरण सहकार विभागाच्या माध्यमातून केली जाते. अनेकदा संबंधित संस्थेच्या सभासदांना निवडणूक प्रक्रियेची माहितीच उपलब्ध होत नाही. या संकेतस्थळामुळे निवडणुकीची सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध होईल. सहकारी संस्थांच्या नविडणुका आॅनलाईन घेण्यासाठी प्राधिकरणाचे संकेतस्थळ असणे गरजेचे आहे. त्यासाठी प्राधिकरणाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाली असून, ८ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. सहकार कायदा तरतुदी, सहकारी संस्थांची अ, ब, क आणि ड या श्रेणी नुसार विभागणी, नामनिर्देशन पत्र कसे असते, निवडणूक प्रक्रिया काय आहे याची माहिती यात येईल.हळूहळू बदल होणारसुरुवातीस अ श्रेणीतील म्हणजेच साखर कारखाने, बँका यांच्या निवडणुका आॅनलाइन घेतल्या जातील. त्यांचे नामनिर्देशनपत्र देखील आॅनलाईन घेण्यात येईल. टप्प्याटप्प्याने सर्व संस्थांच्या निवडणुका आॅनलाइन घेतल्या जातील. हे सर्व बदल एकदम होणार नाहीत. हळूहळू संकेतस्थळात असे बदल करुन निवडणूक आॅनलाइन करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :onlineऑनलाइनElectionनिवडणूक