अधिकारी-ग्रामस्थांचे सहकार्य हवे : चांदेरे
By Admin | Updated: June 6, 2015 22:22 IST2015-06-06T22:22:00+5:302015-06-06T22:22:00+5:30
आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. शिवसेना मुळशी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे,

अधिकारी-ग्रामस्थांचे सहकार्य हवे : चांदेरे
पौड : आदर्श गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. शिवसेना मुळशी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असे पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख व मुळशीचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांनी मातेरेवाडी येथे सांगितले.
घोटवडे, मातेरेवाडी येथे शंभूमहादेव मंदिर सभामंडप व स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जि. प. सदस्या स्वातीताई हुलावळे होत्या. स्वातीताई हुलावळे व बाळासाहेब चांदेरे यांच्या संयुक्त फंडातून विकासकामांची सुरुवात या वेळी करण्यात आली. याप्रसंगी युवा नेते बाबासाहेब साखरे, सुरेश हुलावळे, कासारसाई ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भिंताडे, मा. सरपंच रा. सु. घोगरे, घोटवडे गावचे उपसरपंच पोपट भेगडे, संजय मातेरे, गंगाराम मातेरे, कुंडलिक मातेरे, उत्तम घोगरे, लहू घोगरे, जनार्दन घोगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी मातेरेवाडी स्मशानभूमी व महादेव मंदिरासाठी पाच गुंठे जागा देणाऱ्या नथु गजाबा घोगरे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. माजी सरपंच आनंदा घोगरे यांनी प्रास्ताविक केले, तर शिवसेना शाखाप्रमुख लक्ष्मण कानगुडे यांनी आभार मानले. (वार्ताहर)