नाना पेठेत सीएनजी टाकीचा भडका
By Admin | Updated: November 16, 2014 00:22 IST2014-11-16T00:22:50+5:302014-11-16T00:22:50+5:30
अचानक भडका उडल्याने त्यात दोन लहान मुलांसह एक वृद्ध भाजला़ नाना पेठेतील चाचा हलवाई चौकानजीक आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली़

नाना पेठेत सीएनजी टाकीचा भडका
पुणो : नाना पेठेत स्पेअरपार्टच्या दुकानात सीएनजीच्या टाकीची विल्हेवाट लावताना अचानक भडका उडल्याने त्यात दोन लहान मुलांसह एक वृद्ध भाजला़ नाना पेठेतील चाचा हलवाई चौकानजीक आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली़
उमर फारुक शेख (वय 3), फरदीन असीम शेख (वय 2) आणि मोहम्मद हुसेन समद (वय 7क्, तिघे रा़ 561 नाना पेठ) अशी भाजलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
नाना पेठेतील चाचा हलवाई चौकात स्पेअरपार्ट विक्रेत्यांची दुकाने आहेत़ तिथेच एका जुन्या गाडय़ांची विल्हेवाट लावून स्पेअरपार्ट बाजूला करण्याचा व्यवसाय आह़े तेथील सलीम या कामगाराने सीएनजी टाकीतील वायू काढून टाकण्यासाठी नॉब काढला होता व तो जमिनीच्या दिशेने ठेवला होता़ शेजारील वाडय़ातील दोन मुले जवळच खेळत होती़ या टाकीतील वायू पूर्णपणो निघून गेलेला नव्हता़ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक स्पार्क होऊन टाकीतील गॅसचा भडका उडाला़ त्यात दोन लहान मुले व तिथेच असलेले समद हे होरपळल़े या टाकीतील ज्वाळा सुमारे 15 फूट उंच उसळल्या होत्या़ या आगीत एक दुचाकीही जळून खाक झाली़ त्यामुळे एकच घबराट पसरली़
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे प्रभारी अधिकारी मुबारक शेख, केंद्र प्रमख प्रकाश गोरे, जवान अजीम शेख, अतुल खोपडे, सुभाष खाडे, धर्मराज माने, अभिजित खळकर, कैलास पायगुडे, मेहबूब शेख हे घटनास्थळी रवाना झाल़े तोर्पयत स्थानिक नागरिकांनी तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केल़े (प्रतिनिधी)