शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

गुलटेकडीला सीएनजी गॅस वाहिनी फुटली; घाबरलेले नागरिक पळाले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 15:53 IST

रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली.

ठळक मुद्देपोलिसांकडून तात्काळ बंदोबस्तामुळे सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना नाही घडली

पुणे : ड्रेनेजलाईन टाकण्याकरिता रस्त्याची खोदाई सुरू असताना जमिनीखालून गेलेली सीएनजी गॅस वहिनी फुटली. गळती लागलेल्या वाहिनीमधून मोठ्या प्रमाणावर गॅस बाहेर फेकला जात होता. त्यावेळी शेजारच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घाबरलेले नागरिक गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर पळाले. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना यावेळी घडली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास गुलटेकडी येथे घडली.स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडित नेहरू रस्त्यावरील गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट चौकादरम्यान ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस रखडलेले हे काम आयुक्तांच्या परवानगी नंतर सुरू करण्यात आले. डायस प्लॉट चौकात एमएनजीएलचा सीएनजी पंप आहे. याठिकाणी ही सीएनजी वाहिनी जोडण्यात आलेली आहे. मलवाहिनी टाकण्यासाठी याठिकाणी खोदाई करण्यात येत होती. 

सिमेंटचा रस्ता फोडून ही खोदाई सुरू होती. ही खोदाई सुरू असताना जमिनीखालील सीएनजी गॅस वाहिनी फुटली. त्यानंतर हे काम तात्काळ थांबविण्यात आले. याची माहिती एमएनजीएल कंपनीला कळविण्यात आली. दरम्यान, प्रेशरमुळे गॅस मोठ्या प्रमाणावर बाहेर पडू लागला होता. जवळपास सात ते आठ फुटांपर्यंत हा वायू वर उडत होता. वायू गळतीमुळे आवाजही होत होता. त्यामुळे घाबरलेले नागरिक घराबाहेर पळाले. अनेकांनी तर घरातील सिलेंडर्स घेऊन पळ काढला. स्थानिक कार्यकर्त्यांनी माहिती दिल्यानंतर स्वारगेट पोलीस घटनास्थळी धावले. पोलीस बंदोबस्त लावत तात्काळ गर्दी हटविण्यात आली. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून सर्वांना घरी पाठविले.एमएनजीएलचा आपत्कालिन विभाग, पालिकेचा आपत्कालिन विभाग, अग्निशमन दलाच्या जवानांनी एकत्रित रित्या ही गळती थांबविली.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसCylinderगॅस सिलेंडर