राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:33+5:302021-01-08T04:33:33+5:30
पुणे : पंजाबापासून अरबी समुद्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ५ ...

राज्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण
पुणे : पंजाबापासून अरबी समुद्रापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. येत्या ५ दिवसात असेच वातावरण राहण्याची आहे. दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज सकाळपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत होते. मुंबईत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सांगली ०.२, सातारा ०.४, औरंगाबाद ०.१, अकोला ०.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर येथेही पावसाचा शिडकावा झाला.
पंजाबपासून सौराष्ट्र, गुजरात तसेच ईशान्य अरबी समुद्र या क्षेत्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. हे वातावरण अजून पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे संपूर्ण राज्यातील बर्याच भागातील किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
राज्यात ५, ६ व ७ जानेवारी दरम्यान रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
७ जानेवारी रोजी जालना, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच ८ जानेवारी रोजी मराठवाड्यातील अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.