ढगाळ हवामानाची टांगती तलवार
By Admin | Updated: January 1, 2015 23:40 IST2015-01-01T23:40:07+5:302015-01-01T23:40:07+5:30
इंदापूर तालुक्यात कळस, बिरंगुडी, परिसरात मंगळवारी (दि ३०) रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले.

ढगाळ हवामानाची टांगती तलवार
भवानीनगर : इंदापूर तालुक्यात कळस, बिरंगुडी, परिसरात मंगळवारी (दि ३०) रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे.
अवकाळी पावसाची द्राक्ष उत्पादकांवर कायम टांगती तलवार आहे. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब पिकाचे काही दिवसांपूर्वी (नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात) मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाबरोबरच ढगाळ हवामानाचे संकट ओढवले आहे. इंदापूर, बारामती मध्ये सुमारे ५ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे.
यामध्ये २०० हेक्टर निर्यातक्षम द्राक्ष लागवडीचे क्षेत्र आहे. शरद सीडलेस, कृष्णा सीडलेस, सोनाक्का, जंबो सीडलेस आदी द्राक्षलागवड करण्यात आली आहे.
काल रात्री बिरंगुडी, कळस भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. २० ते २५ मिनिटे या पावसाच्या हलक्या सरी पडल्याचे येथील शेतकरी कृष्णा सांगळे यांनी सांगितले. सांगळे यांची मलेशिया, दुबई येथे द्राक्ष निर्यात सुरू आहे. (वार्ताहर)
च्या पावसाने परिसरातील १५०० एकर क्षेत्रातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्षाचे मणी फुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले. ढगाळ हवामानामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे, असे येथील शेतकरी सांगळे यांनी सांगितले.
ढगाळ हवामानामुळे थंडीचे प्रमाण घटते. परिणामी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे पिकांवर रोगराई वाढण्याचा धोका असतो. अवकाळी पावसाने द्राक्षाचे मणी फुटतात. द्राक्षाचे मणी काळे पडणे, डाग पडण्याचा धोका देखील असतो.
- बी. एस. घुले, कृषितज्ज्ञ