ढगाळ वातावरण; काही ठिकाणी सरी

By Admin | Updated: June 19, 2015 22:37 IST2015-06-19T22:37:54+5:302015-06-19T22:37:54+5:30

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर परिसरात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागांत पाऊस पडला. मात्र, त्याचे प्रमाण अंशत: असल्याने त्याचा

Cloudy atmosphere; Stay in some places | ढगाळ वातावरण; काही ठिकाणी सरी

ढगाळ वातावरण; काही ठिकाणी सरी

पिंपरी : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहर परिसरात गुरुवारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागांत पाऊस पडला. मात्र, त्याचे प्रमाण अंशत: असल्याने त्याचा कोणताच परिणाम जनजीवनावर दिसून आला नाही.
मागील दहा दिवसांपासून आभाळ ढगांनी व्यापून गेले आहे. मात्र, दमदार पाऊस बरसत नसल्याचा अनुभव शहरासह लगतच्या ग्रामीण भागात येत आहे. गुरुवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. त्यानंतर काही ठिकाणी रिमझीम पाऊस झाला. त्यामुळे आता मोसमी पाऊस बरसण्याची शक्यता निर्माण झाली होती. गुरुवारी रात्री तुरळक बरसल्यावर रिमझीम पावसाच्या हलक्या सरींसह शुक्रवार उजाडला. सकाळी ७ व दुपारी १२ च्या सुमारास अनेक भागांत चांगल्या सरींमुळे वातावरण ओलेचिंब झाले. मावळ तालुक्यात बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. त्याचा शेतीला काही अंशी फायदा होणार आहे. मात्र, अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cloudy atmosphere; Stay in some places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.