शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाषाणला मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस; तासाभरात ७७ मिमी पावसाची बरसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 22:00 IST

पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : संपूर्ण राज्य पावसाच्या प्रतिक्षेत असताना पाषाण येथील काही भागात मंगळवारी दुपारी ढगफुटीसारखा पाऊस झाला. काही समजायच्या आत मेघगर्जनेसह अचानक जोरदार पाऊस झाला. त्यावेळी शहरात विशेषत: औंध, पुणे विद्यापीठासह इतरत्र थोडाही पाऊस झाला नाही. 

पाषाणचा काही भाग आणि बाणेर या परिसरात हा पाऊस झाला. पाषाण येथे हवामान विभागाचे पर्जन्यमापन केंद्र असल्याने या ठिकाणी या पावसाची नोंद झाली. सुमारे तासाभरात ७७.२ मिमी पाऊस पडला. 

दिवसाचे उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता यामुळे स्थानिक अस्थिरता निर्माण झाली. त्यामुळे दुपारच्या वेळी कम्यलोनिंबस परिस्थिती निर्माण झाली. खालून हवेचा दाब अधिक असल्याने पाणीदार ढगाची निर्मिती झाली. ढगामध्ये एकावर एक बाष्पाचे थर तयार झाले. त्याचवेळी खालून येणार्‍या हवेच्या दाबापेक्षा या ढगाचे वजन अधिक झाल्याने तो मर्यादित क्षेत्रात कोसळला. लोहगाव भागातही काहीशी अशीच परिस्थिती निर्माण होत होती. परंतु, तेथे पाऊस झाला नाही.

पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

अचानक झालेल्या धो धो पावसामुळे पाषाण परिसरात सुरु असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते़ काही ठिकाणी रस्ते पाण्याने भरुन वाहताना दिसत होते.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामान