शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मंचर टपाल कार्यालयातील रजिस्टर सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:49 IST

कर्मचाऱ्यांचा अभाव : १० दिवसांपासून नागरिक त्रस्त

मंचर : कर्मचाऱ्याअभावी मंचर येथील टपाल कार्यालयातील रजिस्टर व इतर सेवा मागील १० दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. टपाल कार्यालयात आधारकार्ड काढणे बंद झाल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.मंचर येथील टपाल कार्यालयात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. नारायणगाव, जुन्नर या पोस्ट आॅफिसपेक्षा मंचर पोस्ट आॅफिसमध्ये कामाचा व्याप जास्त आहे. मात्र त्या तुलनेत कर्मचाºयांची संख्या कमी आहे. १ पोस्टमास्तर, २ क्लार्क, ३ पोस्टमन, २ मदतनीस यांना सर्व काम पाहावे लागते. कर्मचाºयाअभावी रजिस्टर, मनिआॅर्डर, स्पीडपोस्ट, पार्सल या सेवा मागील १० दिपसांपासून बंद आहे. यापूर्वी ही कामे करणारा क्लार्क लोणी येथील पोस्ट आॅफिसमध्ये काम करण्यासाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कामकाज ठप्प झाले.

बिहार येथून नवीन कर्मचारी आला. मात्र, त्याने सुट्टी घेतली आहे. दुसºया एका नवीन कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आली. मात्र त्याचे प्रशिक्षण झाले नसल्याने त्याला पासवर्ड नाही. परिणामी पोस्ट आॅफिसमधील सर्व कामकाज ठप्प झाले आहे. नवीन कर्मचाºयाचे ट्रेनिंग झाले नसल्याने त्याला पासवर्ड मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हेलपाटे मारावे लागत आहे. नागरिकांना तातडीने कागदपत्रे पाठविण्यासाठी तसेच कायदेशीर कामासाठी रजिस्टर पाठविणे महत्त्वाचे असते. मात्र ही सेवा बंद असल्याने अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पोस्ट आॅफिसमध्ये आधारकार्ड अपडेट करण्यासाठी माणूस उपलब्ध नसल्याने ती सेवा बंद आहे. आधारकार्ड काढणारा कर्मचारी दुसरे काम पाहतो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागत आहे.४१० दिवस रजिस्टर सेवा ठप्प असल्याने नागरिक जाब विचारत आहे. मंचरमधील नागरिकांना रजि. पाठविण्यासाठी कळंब अथवा इतर पोस्ट आॅफिसमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. पोस्ट आॅफिसमध्ये काम करणाºया कर्मचाºयांवर कामाचा लोड वाढला आहे. पोस्ट आॅफिसमध्ये प्रशिक्षित कर्मचाºयाची तातडीने नेमणूक करून बंद असलेल्या रजि. व इतर सेवा तातडीने सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPost Officeपोस्ट ऑफिस