कळस, धानोरी, विश्रांतवाडीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By Admin | Updated: May 25, 2016 04:47 IST2016-05-25T04:47:34+5:302016-05-25T04:47:34+5:30
महापालिकेच्या होळकर जलकेंद्र येथून पाणीपुरवठा करणाऱ्या एक हजार मिमी व्यासाच्या एमएस लाइन शिफ्टिंग करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी, (दि. २६) कळस

कळस, धानोरी, विश्रांतवाडीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पुणे : महापालिकेच्या होळकर जलकेंद्र येथून पाणीपुरवठा करणाऱ्या एक हजार मिमी व्यासाच्या एमएस लाइन शिफ्टिंग करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी, (दि. २६) कळस, धानोरी, मुंजाबावस्ती, लोहगाव, विमाननगर, विद्यानगर, विश्रांतवाडी आदी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपिंग येथील विद्युत व स्थापत्यविषयक अत्यावश्यक कामे करायची असल्याने गुरुवारी (दि. २६) शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट, बिबवेवाडी, कोथरूड, लॉ कॉलेज रोड, सिंहगड रोड, औंध, पाषाण, बाणेर, चतु:शृंगी परिसर आदी भागाचा पाणीपुरवठाही बंद राहणार असल्याची सूचना यापूर्वी देण्यात आलेली आहे.