ग्राहकांनी बंद पाडले दुचाकीचे शोरूम

By Admin | Updated: January 8, 2015 23:09 IST2015-01-08T23:09:51+5:302015-01-08T23:09:51+5:30

गेल्या आठ महिन्यांपासून ४० दुचाकी वाहनांचे रजिस्ट्रेशन व पासिंग करण्याबाबत टाळाटाळ केल्यामुळे संतप्त वाहनमालकांनी बुधवारी (दि. ७) शोरूम बंद पाडले.

Closed customers bunny showroom | ग्राहकांनी बंद पाडले दुचाकीचे शोरूम

ग्राहकांनी बंद पाडले दुचाकीचे शोरूम

दौंड : शहरातील पाषाणकर अ‍ॅटोचे शोरूमकडून गेल्या आठ महिन्यांपासून ४० दुचाकी वाहनांचे रजिस्ट्रेशन व पासिंग करण्याबाबत टाळाटाळ केल्यामुळे संतप्त वाहनमालकांनी बुधवारी (दि. ७) शोरूम बंद पाडले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
दौंड येथील होंडा कंपनीचे अधिकृत विक्रेते असलेले पाषाणकर अ‍ॅटो प्रा. लि. मधून ४० ग्राहकांनी दुचाकी आठ महिन्यांपूर्वी रोख व कर्ज स्वरुपात खरेदी केल्या आहे. या दुचाकी वाहनांचे पासिंग व रजिस्ट्रेशन संबंधित शोरुमने करुन देणे बंधनकारक असताना देखील गेल्या आठ महिन्यांपासून टाळाटाळ केली जात होती. यासह वाहनांचे पासिंग, विमा, पूर्ण अ‍ॅसेसरिज ग्राहकांना दिल्या गेल्या नाहीत. यामुळे संबंधित वाहन मालकांना गाडी चालविताना अडचणी निर्माण होत आहे.
याबाबत संबंधित वाहन मालकांनी वेळोवेळी शोरुममध्ये याबाबत चौकशी केली. परंतु त्यांना उडवाउडवी उत्तरे मिळाली. अखेर त्यांचा संताप अनावरण आल्याने त्यांनी बुधवारी सकाळी शोरुममध्ये येऊन काही काळी शोरुम बंद पाडले. तरीसुध्दा काही कारवाई न झाल्याने ग्राहकांचा संताप वाढला. ही घटना कळताच पुण्यातुन सायंकाळी ५ वाजता शोरुमच्या संबंधित अधिकारी दाखल झाले. त्यांनी ग्राहकांशी चर्चा करुन गाडींचे रस्ट्रिेशन व पासिंग सहा दिवसांच्या आत सर्व खर्चासह करुन देण्याचे मुद्रांकवर लिहून दिल्यानंतर तणाव निवळला.

चोरीच्या भीतीने गाड्या घरातच..
४संबंधित गाड्यांना विमा, आरटीओ पासिंग व संबंधित कागदपत्रे नसल्याकारणास्तव या गाड्या खरेदी करून न वापरताच घरात ठेवण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. तसेच या कंपनीच्या स्वयंचलित दुचाकी वापरामध्ये सर्वांत जास्त संख्या महिलावर्गाची आहे. त्यामुळे त्यांना गाडी वापरताना एकतर चोरीची किंवा पोलिसांच्या कारवाईची भीती मोठ्या प्रमाणात वाटते. एकंदरीतच रोख स्वरुपात दुचाकी घेऊन सदर गाडी घरामध्ये किंवा अंगणामध्ये झाकून ठेवण्याची वेळ आली आहे.

...तर दुचाकीसह दोषी शोरूममालकांवर कारवाई करावी
दौंड शहर व तालुक्यात वाहन नोंदणी क्रमांक नसलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशी दुचाकी वाहनांवरुन संबंधित नागरिक राजरोजसपणे तालुक्यात ये-जा करीत असताना दिसतात. या वाहनांवर बारामती आरटीओ व स्थानिक पोलिसांनी कडक कारवाई करण्यासह संबंधित शोरूममालकांवर देखील फौजदारी कारवाई करण्याची मागणी पुढे आली आहे.

पासिंग मिळण्यास टाळाटाळ
४यासंदर्भात पाषाणकर अ‍ॅटोचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन घाटे म्हणाले की, वास्तविक पाहता ग्राहकांच्या गाड्यांना वेळीच नंबर मिळाले नाहीत ही गंभीर बाब आहे. मी नव्यानेच कामकाजाचे सूत्र हाती घेतले असून, यासंदर्भात योग्य तो मार्ग काढला जाणार आहे. तत्पूर्वी ग्राहकांना त्यांच्या गाड्या पासिंग करुन देण्याची हमी म्हणून स्टॅम्पपेपरवर लिहून दिले आहे.

Web Title: Closed customers bunny showroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.