शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

पुण्यात विविध ठिकाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:06 IST

मराठा समाजाच्या भावना तीव्र; रास्ता रोको व गाव बंद ठेवण्यावर भर

नीरा : तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत पुरंदर तालुक्यातील सर्व गावांमध्ये बंद पाळण्यात आला. गेली दोन तीन दिवस महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलना मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या दरम्यान पुरंदर तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये कुठेही आंदोलनाची धग जाणवली नाही.शुक्रवारी सकल मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने पुरंदर तालुका बंदची हाक दिली होती. नीरा शहरात सकाळ पासून दिवसरभर कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील युवकांनी होतात भगवे झेंडे घेऊन नीरा शहरात फेरी काढून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, सोमेश्वर कारखान्याच्या संचालक दिलीप थोपटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे, कुलदीप पवार, कु.प्रियंका यादव-सुळसकर, कांचन निगडे, राजेश काकडे, सचिन मोरे, अनिल चव्हाण, राजेंद्र धुमाळ, दयानंद चव्हाण, राजेश काकडे, यांनी तीव्र संताप व्यक्त करत शासनाचा निषेध केला. उपस्थिती युवकांनी मागील आठवड्यात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे व रोहन तोडकर या तरूणांना श्रद्धांजली वाहत राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नीरेच्या तलाठी शितल खराद यांना राजेंद्र थोपटे, नंदकुमार शिंदे व सचिन मोरे यांनी मराठा आंदोलनातील मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नीरेचे उपसरपंच बाळासाहेब भोसले उपस्थित होते. अजीत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले तर पृथ्वीराज निगडे यांनीआभार मानले.शहरासह परिसरातील पिंपरे (खुर्द) निंबुत, गुळूंचे, राख, कर्नलवाडी, पाडेगाव, जेऊर, मांडकी, येथील युवकांनसह ज्येष्ठांनी एकत्र येत नियोजत पुरंदर तालुका बंद आंदोलन केले. नीरेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणावर युवक एकत्र येत सकाळी अकरा वाजता नीरा शहरात फेरी काढून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नीरा ग्रामपंचायती समोर पुणे-पंढरपुर पालखी मार्गावर प्रतीकात्मक रस्तारोको आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनाला नीरा बाजारपेठेतील व्यावसायिकांनी अभुतपुर्व प्रतीसाद देत सहकार्य केले. आंदोलनावेळी हजारोंच्या संख्येने युवक उपस्थित होते. मराठा आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलना दरम्यान कोणा आंदोलकांनवर गुन्हा दाखल झाल्यास त्यांचे दावे विनाशुल्क चालवण्याचे पत्र अँड.सो. शुभांगी कुलदीप पवार यांनीयावेळी दिले.आंदोलकांकडून मंचर-भीमाशंकर रस्त्यावर केला रास्ता रोकोडिंभे : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी गुरूवार (ता. २६) रोजी डिंभे (ता. आंबेगाव) मंचर-भिमाशंकर रस्त्यावर रास्ता रोक ो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास सर्व जाती धर्मांतील संघटनांनी पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.मराठा संघटना समितीने राज्यभर पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या आंदोलनाचे पडसाद आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागापर्यंत पोहचले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी गुरूवारी डिंभे बंदची हाक देण्यात आली. सकाळी ११ ला डिंभे येथे शिवाजी महाराजांच्या पुतळयाले पुष्पहार अर्पण क रून गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर डिंभे येथे मंचर भिमाशंकर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी डिंभे येथील व्यापारी संघाला आदिवासी संघटना, मागासवर्गीय संघटना यांनी उस्फुर्त पाठिंबा दिला.यावेळी विविध संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व सौरव राक्षे, शिवराज राक्षे, विलास सुर्यवंशी, संतोष राक्षे, प्रदिप अमोंडकर, आनंद राक्षे, विकास कोकणे, तुकाराम ढेरंगे, किरण राक्षे, गणेश शिरसाठ, गणेश कसबे, हेमंत राक्षे, खंडू थोरात, ब्रम्हा ठाकूर, किशोर कोकणे, तुकाराम राक्षे, विनायक सातकर, नितीन बो-हाडे, शंकर नायडू, सुरज घोलप, आकाश राक्षे, संतोष घोलप, मंगेश क ानसकर, पो पाटील शशिकांत भवारी, राजेंद्र साळवे, सिताराम कोकणे, विलास कोकणे, अनिल कोकणे, आदि सर्वपक्षिय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.आरक्षणासाठी सोमवारी खेड बंदचाकण : आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने खेड तालुक्यात सोमवार (दि. ३०) रोजी बंद पुकारण्यात आला आहे.या वेळी सकाळी १० वाजता चाकण मार्केटयार्ड- श्री शिवाजी प्रशाला- महात्मा फुले चौक- नगरपरिषद- माणिक चौक या मार्गे छत्रपती शिवाजी महाराज तळेगाव चौकात मोर्चा जाणार आहे. याठिकाणी पुणे-नासिक महामार्गावर रास्ता रोको व शोकसभा होईल. समाजासाठी आत्मबलिदान दिलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली वाहुन मोचार्ची व सभेची सांगता होईल. यादिवशी खेड तालुक्यातील सर्व व्यावसायीकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवुन आंदोलनास आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज खेड तालुका यांनी केले आहे. या बंदमधून हॉस्पिटल, मेडिकल, रुग्णवाहिका इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांततामार्गे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाPuneपुणे