शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

अवैध धंदे बंद करा, अधीक्षकांना मुर्टी ग्रामस्थांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:20 IST

बेकायदा धंदे बंद करा : पोलिसांकडून ग्रामस्थांच्या मागणीला शून्य प्रतिसाद

बारामती : खासदार आदर्श ग्राम योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या मुर्टी मोढवे (ता. बारामती) येथे अवैध धंदे करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. तसेच या अवैध धंदेचालकांची परिसरात दहशतदेखील आहे. गावातील अवैध धंदे बंद करावेत यासाठी ग्रामस्थांनी आता थेट पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनाच साकडे घातले आहे. मुर्टी, मोढवे या गावांमध्ये दारू, मटका, जुगार असे आवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. दारू व जुगाराच्या व्यसनांमुळे येथील तरूण पिढी उद्धवस्त झाली आहे. शिकण्यासवरण्याच्या वयात तरूण मुले व्यसनाधीन होत आहेत. येथील अवैध धंद्यामध्ये महिलांचाही सहभाग असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

अवैध धंद्यांमधून सबंधीत व्यक्ती लाखो रूपये कमवत आहेत. जुगार व मटक्याच्या नादामुळे सर्वसामान्य मात्र कष्टाची कमाई घालवत आहेत. येथील जुगार, मटका अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. मात्र कारवाईनंरत मागे लगेच धंदे पूर्ववत सुरू होतात. त्यामुळे पोलीस केवळ कारवाईचा फार्स करीत आहेत, आसाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाप्रमाणे गावामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात ठराव घेतले जातात. ग्रामसभेत ठरावांना मंजुरी देखील मिळते. मात्र त्यानंतरही अवैध धंदे सर्रासपणे सुरू राहतात. यासंदर्भात माध्यमांधून वारंवार बातम्या देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच येथील ग्रामस्थांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, बारामतीचे उपविभागिय अधिकारी कार्यालय यांच्याकडे यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याचेही, ग्रामस्थांनी निवेदनामध्ये नमुद केले आहे. गावठी हातभट्टीवरील दारू पिल्यामुळे आप्पासो येळे (रा, मोराळवाडी) यांचा २५ आॅगस्ट २०१८ रोजी मृत्यू झाला असल्याचे, अधिक्षकांना दिलेल्या निवेदानत ग्रामस्थांनी नमुद केले आहे. तसेच अवैध धंदे चालकांमध्ये ग्रामपंचायत सदस्याचादेखील सहभाग आहे. गावातील अवैध धंद्याविरोधत तक्रारी करणाºया तक्रारदारांच्या व त्यांच्या कुटूंबाच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे तक्ररदारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी ग्रामीण अधिक्षकांकडे केली आहे.स्थानिक पोलिसांना अनेकदा याबाबत ग्रामस्थांनी कल्पना देऊन कारवाईची मागणी केली आहे. यासोबतच ग्रामसभेमध्ये ठरावही करण्यात आलेला आहे. मात्र, हप्तेखोरीमुळे या अवैैध व्यवसायांवर कारवाई होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अनेक अवैैध व्यवसायांमध्ये महिलांचाही समावेश असल्याचा आरोप ग्रामस्थांनी अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेला आहे. नागरिकांच्या या निवेदनाचा पोलीस गांभिर्याने विचार करुन कारवाई करतात की त्यालाही केराची टोपली दाखविली जाते हा प्रश्न आहे?

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेliquor banदारूबंदी