कर्क रोग विभाग बंद

By Admin | Updated: November 7, 2014 00:34 IST2014-11-07T00:34:20+5:302014-11-07T00:34:20+5:30

तरुणामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.

Close the cancer department department | कर्क रोग विभाग बंद

कर्क रोग विभाग बंद

सुवर्णा नवले, पिंपरी

तरुणामध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर महिलांमध्येही कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली, धूूम्रपान, तंबाखू याचबरोबर आहारामध्ये होत असलेला बदल हेही कर्करोगाचे प्रमुख लक्षण असल्याचे दिसून येत आहे, असे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे म्हणने आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेला विभाग डॉक्टर नसल्याने बंद केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात कर्करोग उपचारासाठी डॉक्टरांच उपलब्ध नाहीत. डॉक्टर व औषधांच्या अभावी कर्करोग विभाग बंद करण्यात आला आहे. गेल्या एक वर्षापासून येथे कर्करोगावर उपचार होत नाहीत. कर्करोगाचे रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर हे रुग्ण पुण्यातील ससून अथवा इतर दवाखान्यात पाठवले जातात. वायसीएम मध्ये होणारी डॉक्टरांची ओढाताण यामुळे डॉक्टर दवाखान्यामध्ये टिकून रहात नाहीत. तसेच प्रशासकीय विभागाची कामाबद्दलची उदासीनता यामुळे रुग्णांची हेळसांड होते.
कर्करोगावरील उपचारासाठी लागणारे साहित्य वायसीएममध्ये वेळेवर उपलब्ध होत नाही. तसेच कागदपत्रांमध्ये फे रफ ार करू न रुग्ण उपचारासाठी बाहेर पाठविले जातात. या रूग्णाणलयात दिवसाला ३५० कर्करोगाचे रूग्ण यायचे. मात्र, आता हा विभाग पूर्णपणे बंद झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
सर्वसामान्य रूग्णांसाठी आळंदी येथील इंद्रायणी राजीव गांधी योजना कर्करोग वरील उपचारासाठी जीवनदायी योजना ठरत आहे. या योजनेत रुगणांना उपचारासाठी दीड लाखांपर्यत मदत मिळते. यासाठी रुग्णांना ओळखपत्र व रेशनकार्डची गरज असते. यामध्ये रुग्णांच्या प्राथमिक उपचारांसहित केमोथेरपी व रेडियोथेरपी ट्रिटमेंट मिळते. कॅन्सरवरील सर्वात महत्त्वाचा उपाय ही थेरपी आहे. सर्वसामान्य या योजनेपासून वंचित राहतात. या योजनेसाठी नागरिकांना एकही पैसा खर्च नाही.
डॉ. अंकोलीकर म्हणाले, ‘‘कर्करोगाचे प्रमाण तरूणांमध्ये मोठया प्रमाणावर वाढत चालले आहे. त्यास कारणीभूत समाजातील बदलती परिस्थिती, युवा वर्गामध्ये वाढणारी व्यसनाधीनता, तसेच दिवसेदिवस बदलत चाललेला आहार अपायकारक ठरत आहे. त्याचप्रमाणे अपायकारक शीतपेये घेणे तसेच केमिकल्सचे आहारातील प्रमाणात वाढ ही महत्त्वाची लक्षणे आहेत. युवा वर्गाची व्यसने दिवसेदिवस वाढत चालली आहेत. युवा वर्ग चटकन पाश्चात्य संस्कृती अवगत करत आहे यामुळे युवा वर्गाची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. यामुळे युवकांना आतडयाचे कॅन्सर मध्ये मोठया प्रमाणात वाढ दिसू लागली आहे. पुरूषांमध्ये तोंडाचा, मेंदूचा कर्करोग, ग्रंथीचा कर्करोग याचे प्रमाण जास्त आहे. सर्वात फुफुसाचा कर्करोग घातक आहे. यामध्ये तिस-या व चौथ्या पातळीवर या कर्करोगाचे निदान समजून येत नाही.
शहरातील मेडिकल्स मध्ये कर्करोगावरील औषधे मोठया प्रमाणात आहेत. मात्र वेगवेगळया ब्रँडची औषधे वेगवेगळया किंमतीला मिळतात. मात्र औषधाचा ब्रँड जरी वेगळा असला तरी किंमती मध्ये फ रक पडत नाही. हे नागरिकांना समजत नाही. औषध हे एकच असते ते साधे किंवा भारी नसते. यामुळे नागरिकांनी औषधे घेताना भूलथापाना बळी पडतात.’’

Web Title: Close the cancer department department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.