साह्यकडा ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी नवरी सुळका केला सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:06 IST2021-02-05T05:06:49+5:302021-02-05T05:06:49+5:30
माहुलीगड, पळसदुर्ग आणी भंडारदुर्ग या दुर्ग त्रिकुटाला एकूण १८ सुळके आहेत. भंडारदुर्ग आणि चंदेरी डोंगर यांच्यामधील खिंडीत नवऱ्याची करवली, ...

साह्यकडा ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी नवरी सुळका केला सर
माहुलीगड, पळसदुर्ग आणी भंडारदुर्ग या दुर्ग त्रिकुटाला एकूण १८ सुळके आहेत. भंडारदुर्ग आणि चंदेरी डोंगर यांच्यामधील खिंडीत नवऱ्याची करवली, भटोबा, नवरी, नवरीची करवली आणि बाण हे एका पेक्षा एक आरोहणास कठीण असणारे सुळके आहेत. यातील नवरी सुळका आरोहण करण्याचे आव्हान साह्यकडाच्या गिर्यारोहकांनी उचलले. माहुलीगड आणि तेथील अवघड वाटांची माहिती असलेले गाईड रघुनाथ कृष्णा आगिवले यांच्यासोबत जंगलातील खडतर वाटेने भारंगी नदी ओलांडून चंदेरीच्या धारेवरून खिंडीच्या खाली असलेल्या एका छोट्याशा सपाटीवर पोहोचली.
प्रारंभी विधिवत श्रीफळ अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर लीड क्लाइंबर श्रीराम पवळे यांनी सुळक्यावर चढाई चालू केली त्यास अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी हे बिलेअर होते.
सावधगिरी बाळगून रोप फिक्स करत श्रीरामने ते आवाहन लीलया पार केले. त्यानंतर किरण पोतले, राहुल खोराटे, सचिन पाटील, सागर मांडेकर, तलाठी भाऊसाहेब पवनकुमार शिवले, आदेश चौधरी, निखिल पोखरकर, ॲड. किरण दौंडकर, विलास कुमकर, १४ वर्षीय बाल गिर्यारोहक विक्रांत चौधरी, महिला गिर्यारोहक श्रुतिका खांदवे आणि प्रगती चौधरी यांनी झुमरिंग करत सुळक्याचा माथा गाठला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषात तिरंगा फडकविण्यात आला.
३१ शेलपिंपळगाव सुळका
माहुली गडालगतचा नवरी सुळका यशस्वीपणे सर केल्यानंतर जल्लोष करताना गिऱ्हारोहक.