शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

MPSC | लिपिक, टंकलेखक, कनिष्ठ अभियंतापदे आता ‘एमपीएससी’मार्फत भरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 17:00 IST

उमेदवारांना मोठा दिलासा...

पुणे : राज्यातीत सर्व शासकीय कार्यालयांतील लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंता ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यासंदर्भातील सकारात्मक प्रस्ताव राज्यसेवा आयोगाने शासनास सादर केला आहे. त्यामुळे ही पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे लिपिक-टंकलेखक आणि कनिष्ठ अभियंतापदांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पारदर्शक पद्धतीने भरती होण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अराजपत्रित गट ब आणि क संवर्गातील पदांची भरती ‘एमपीएससी’मार्फत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली होती.

त्यासंदर्भातील पाठपुरावा करत असताना उपमुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री भरणे यांच्या दालनांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये आमदार रोहित पवार यांनी या परीक्षा राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यासाठी मागणी लावून धरली होती. आमदार पवार यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या नियमित पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच ही पदे भरण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत प्रक्रिया सुरू होईल.

यापूर्वी काही विभागांच्या परीक्षा विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला; परंतु आता लिपिक, टंकलेखक व कनिष्ठ अभियंता ही पदे ‘एमपीएससी’मार्फतच भरण्यात येणार असल्याने पारदर्शी पद्धतीने भरती होईल, असा विश्वासदेखील आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षा