अडीच वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:20 IST2021-02-18T04:20:26+5:302021-02-18T04:20:26+5:30

संजय काटकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुलीचे अपहरण झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. घटना घडल्यानंतर ...

Clearly raped and murdered a two and a half year old girl | अडीच वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट

अडीच वर्षे वयाच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट

संजय काटकर असे संशयित आरोपीचे नाव आहे. मुलीचे अपहरण झाल्यापासून पोलीस त्याच्या मागावर होते. घटना घडल्यानंतर मृतदेह मालखेड थोपटेवाडी रस्त्यावर मालखेड (ता. हवेली) हद्दीतील पुलाखाली सापडला. सोमवारी दुपारी तीन वाजता कुरण बुद्रुक (ता. वेल्हा) येथील राहत्या घरापासून ती हरवली होती. पीडित अडीच वर्षीय मुलगी सोमवारी दुपारी घराच्या परिसरात खेळत असताना एका पुरुषाबरोबर ती गेल्याचे लोकांनी पोलिसांना सांगितले. त्या पुरुषाने तिला मालखेडपर्यंत रिक्षाने आणले तेथून तो थोपटेवाडी रोडने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुलीचे अपहरण झाल्यापासून पोलीस मालखेड, निगडे, वरदाडे, पानशेत परिसरात शोध घेत होते. मंगळवारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख तपास करण्यासाठी मालखेड गावात आले . मालखेड थोपटेवाडी रोड लगदचा संपूर्ण डोंगर आणि शेतशिवार ओढे नाले त्यांनी पोलीस जवांनासह पिंजून काढला. आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली होती.

Web Title: Clearly raped and murdered a two and a half year old girl